Skip to main content

उंबरठा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 20/07/2009 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थ नेमका संसाराचा कधी कुणास कळला आहे उंबरठ्यावरी तडजोडीच्या जीव सतत हा जळला आहे कुणी जपावे? का जपावे? अन कोणाचे मोठेपण? किती पुरावे? किती उरावे? आकांक्षांचे आत्मसमर्पण.. अहंकार तव फ़ोल पणाचा सर्व समक्ष मी लपवावा घेऊन सार्‍या चुका मजवरी दुभंगलेला जीव जपावा हसरा चेहरा जनांत राही मनांत सार्‍या गर्द छटा शांत जळाच्या अंतरी असती गढूळलेल्या वादळी लाटा नाव तुझे नि गाव तुझे ओळख माझी विरून गेली कर्तव्याच्या मढ्याखाली स्वप्ने सारी पुरून गेली.. - प्राजु
काव्यरस

फोटो कसे पाठवायचे

लेखक अबोल यांनी रविवार, 19/07/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला अनेक फोटो मेल करायचे आहेत तरी क्रुपया त्याची पध्दत सा॑गावी.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 19/07/2009 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
२००४ पासून भारतात संपूर्ण इले़क्ट्रॉनिक यंत्रांनी मतदानाची सुरुवात झाली आहे. झटपट निकाल ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रांचे प्रोग्रॅमिंग हव्या त्या पक्षाला जास्त मते मिळतील अशा रीतीने करता येते असे सांगितले जात आहे. ते तसे करता येईल याबाबत काही शंका असूच शकत नाही. पण ते तसे खरेच केले गेले आहे का?

वाटली डाळ

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 19/07/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या हरबरा डाळ, ४,५ हिरव्या मिरच्या, १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो,चवीनुसार मीठ,१ चहाचा चमचा साखर, तेल, फोडणीचे साहित्य, ओले खोबरे, कोथिंबिर, लिंबू कृती- डाळ ५/६ तास भिजत घालावी ,नंतर उपसून चाळणीवर घालून स्वच्छ धुवून घ्यावी व भरड वाटावी, वाटतानाच त्यात मिरच्या घालाव्यात. कांदा व टोमॅटो चौकोनी चिरावेत. साधारण पळीभर तेलात फोडणी करावी त्यात कांदा व टोमॅटो घालून एक/दोन वाफा आणाव्या,(पोह्यांकरता कांदा घालतो तसे.) नंतर त्यात भरड वाटलेली डाळ घालावी व नीट मिक्स करुन झाकावे व एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात मीठ व साखर घालून ढवळावे व परत झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.

मी देशासाठी काय करतो ?

लेखक दशानन यांनी रविवार, 19/07/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
** मी देशासाठी काय करतो ? खरं पाहता काहीच करत नाही. पण जे करतो ते सामान्य नागरिक म्हणून मला दुस-या देशातील नागरिकासमोर छाती फुगवून सागायला मदत होते की हा, मी भारतीय आहे. सर्वसामान्य जे करतात तेच करतो मी पण सर्व टॅक्स भरतो, नियमीत लाईट बील / पाणी बील भरतो, फोन बिल भरतो, सरकारी / गैरसरकारी संस्थाच्या कार्यक्रमाना मदत करतो जे काही करता येईल ते करतो पण एका माझ्या गोलाकार वर्तुळामध्ये राहून, माझ्या वर्तुळाचा केंद्र बिंदू हा मी व माझे कुटुंब आहे.. त्यानंतर सर्व काही.. येस मी स्वार्थी आहे, स्वतःचाच फायदा बघतो, का बघू नये ?

माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 19/07/2009 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
"माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो." आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो, "भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया" "तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन होई ना!.तरूणपणात भर उन्हात आमच्या गांवाला एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर चढून जाण्याची आमच्यात शर्यत लागायची.दोन तीन बाटल्या पाणी ढोसल्यावर जीव शांत व्ह्यायचा.पण एव्ह्डी कोलाहल होत नसायची." मी म्हणालो, "भाऊसाहेब आता "ag

झूम

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 19/07/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
तारे लुकलुक लुकलुक झूम. काळोख गुपचुप गुपचुप झूम. तपकीरी सोनेरी पाणी झूम. खिशात चंदेरी नाणी झूम. सेलीब्रेशन करायला झूम. उदासी टाळायला झूम. नवीन गावी जायचे झूम. आपल्या घरी परतायचे झूम. कविता सुचत नाहीये झूम. विडंबनच करुया झूम. आता नुसतेच झूमणार की कविता लिहीणार? ही बघ झाली की झूम. झूम. झूम.

अटॅचमेंट!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/07/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीच्या आयुष्यातील पहिली शाळा संपून एक वर्ष झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिची शिशु गटाची शाळा संपली. पहिल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता ती कधी रडली नाही. नव्या शाळेत गेल्या वर्षी बालवाडीसाठी प्रवेश घेतला, तिथेही रमली. आता नव्या शाळेहून येताना बऱ्याचदा आम्ही तिच्या पहिल्या म्हणजे शिशु गटाच्या "पाखर' शाळेवरूनच बरेचदा जातो. अनेकदा त्यामागचा उद्देश असतो - तिच्या शाळेच्या आठवणी कायम ठेवणं! हा आजार "अटॅचमेंट'चा! भावनिक जवळिकीचा. अशा भौतिक वस्तूंशी माझी कदाचित प्रत्यक्ष नात्यांपेक्षाही जास्त अटॅचमेंट आहे. आणि मुलीचीही तशी असावी, अशी (अनाठायी) अपेक्षा आहे.