संगीत महर्षीने निरोप घेतला!
अनेक चित्रपट, बहुतेक सर्व भारतीय भाषांमधली नाटकांना संगीत देणार्या भास्कर चंदावरकर यांचे काल रात्री दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
जगभरातले संगीत त्यांना माहीत होते. भारतीय शास्त्रीय संगीताबरोबर पाश्चिमात्या शास्त्रीय संगीतावरही त्यांची उत्तम पकड होती.
चित्रपट संगीताचे मर्म त्यांच्याइतके क्वचित कुणाला कळत असेल.
खूप वाईट वाटतंय त्यामुळे नीट काही लिहीता येत नाहीये.
भास्करजींकडून वेळोवेळी जे शिकायला मिळालं ते अतिशय मोठं आणि महत्वाचं आहे.
मिसळपाव