Skip to main content

मी एक सिग्नल पिवळा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 17/08/2009 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा कुणी पाळला , कुणी तोडला कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही भावनांचा सागर आटलेला , मी एक स

पाककृती : सांझ सवेरा...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 17/08/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी ऑरलॅन्डो ,फ्लोरिडा ला गेलो होतो तेव्हा तिथे एका भारतीय हाटेला त खाल्लेला हा पदार्थ... तशी पाहता अगदी सामान्य पंजाबी डिश आहे पण प्रेझेंटेशन एकदम मस्त होतं म्हणुन मला जास्त आवडलं. :) , यातल्या पालक पनीर कॉम्बिनेशन मुळे सांझ सवेरा म्हणतात. :) फोटो तसा यथा-तथा च आला आहे ..

शिवसेनेचे (कॉपोरेट) समांतर सरकार

लेखक भोचक यांनी सोमवार, 17/08/2009 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धव ठाकरे शिवसेनेला कॉर्पोरेट लूक देऊ इच्छिताहेत. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती इथे वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20090821/sankraman.htm उद्धवच्या या प्रयत्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. याआधी शिवसेना जे 'समांतर सरकार' चालवत होती, (म्हणजे लफडी निस्तरणे, कुणाचे वैयक्तिक प्रश्न सोडविणे वगैरे) तेच आताही करतेय. पण त्याला दिलेल्या कॉर्पोरेट लूकने त्याची चर्चा नक्कीच होऊ शकते.

स्वातंत्र्यदिन (?) चिरायु होवो ......!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 17/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा ऑगस्टच्या रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी म्हणुन मी व आमचे गृहमंत्री बाहेर पडलो. खारघरच्या शिल्पचौकात एका फुटपाथच्या कडेला झोपलेला दहा-बारा वर्षाचा एक मुलगा दिसला. स्वातंत्रदिनानिमीत्त कुठल्याशा पक्षानं लावलेला कापडी फलक त्याने खाली अंथरला होता, त्याचाच अर्धा भाग अंगावर घेवुन ते लेकरु गाढ झोपलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षे उलटुन गेल्यानंतरदेखील जर आपल्या देशात ५०% च्यावर लोकांची ही अवस्था असेल, तर खरोखर आपल्याला स्वातंत्र मिळालं आहे असं म्हणता येइल का?
काव्यरस

फ्रॅन्कीज

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 17/08/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाक कृती http://misalpav.com/node/8968 या पेठकरकाकांच्या पाककृतीचे एक व्हरायन्ट आहे लालबुंद टोमॅटो ४ मध्यम आकाराचे. चण्याचे पिठ (बेसन) मावेल इतके. कांदे २ आलं १ " कोथिंबीर आवडीनुसार. काश्मिरी तिखट १ टीस्पून मीठ चवीनुसार. चटणी साठी: चिरलेली कोथिंबीर १ वाटी चिरलेला पुदीना १ वाटी हिरव्या मिरच्या ३ मीठ चवीनुसार लिंबू रस १ टेबलस्पून इतरः पोळ्या ,टोमॅटो केचप अमूल बटर कृती: चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमध्ये फिरवून मुलायम वाटून चटणी करून घ्या. कांदे बारीक चिरुन घ्या. आल्याचे बारिक तुकडे करून घ्या. टोमॅटोची प्यूरी करून गाळून घ्या.

महाराष्ट्राच्या शेतीमंत्र्याचा मूर्खपणा!

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 17/08/2009 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्याचे शेती मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी मर्दुमकी दाखवण्याचा सोसापायी नागपूरच्या महाराजबागेत केलेल्या या अचाट शक्तीच्या पुचाट प्रयोगाविषयीची वार्ता इथे पाहिली. या मंत्रीमहोदयांनी म्हणे वाघाच्या कक्षात प्रवेश करून त्याच्या अंगावरून हात फिरवतांना फोटो काढवून घेतले, अर्थात त्यासाठी बरोबर सशस्त्र रक्षक आणि इतर पित्ते न्यायला ते विसरले नाहीत! या प्रकारात वन्यप्राणीविषयक कायदे तर नक्कीच धाब्यावर बसवले गेले आहेत, पण त्या वाघाने हल्ला केला असता तर त्याला काय गोळी घातली असती?

गिफ्ट

लेखक हृषीकेश पतकी यांनी सोमवार, 17/08/2009 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
good morning चा sms वाचताना माझे डोळेच इतके दमलेले असतात | आणि कुशीत शिरावसं वाटतं तेव्हा पालक office मध्ये रमलेले असतात || २१ व्या शतकात तंत्रज्ञान इतकं म्हणून झेपावलं आहे | मुलाला सकाळी उठवण्याचं काम आईने mobile वर सोपावलं आहे || TV,Cell,comp आणि i-pod दिवस माझा तारुन नेतात | AC त बसून दमलेले आई बाबा मग almost रात्रीच घरी येतात || रेडीमेड pizza खायला मग अजिबातंच वेळ लागत नाही | पोट गच्चं भरतं त्याने पण भूक मात्र भागत नाही || आजी असतानाचं घर आमचं आता पूरवी सारखं राहिलं नाहीये | kitchen मध्ये काम करताना मी आईला कित्येक दिवसात पाहीलं नाहीये || रात्री एकटक serials बघताना मग त्यांचा ch

इषय नाजूक हाय

लेखक अन्वय यांनी रविवार, 16/08/2009 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
इषय नाजूक हाय. पण समद्यांस्नी निगडित हाय. म्हून म्हटलं पाह्य जरा मिपावर टाकून. म्हंजी कलंय समद्यास्नी. म्हंजी इषय तसा आपल्या पुरषांच्या बाजूचाच हाय. त्या तिकडं पार अफगाणिस्तानात म्हणं बायकांस्नी नवऱ्याला "नाय' म्हटली की तिला पार काइच खायला द्यायचं नाय. म्हंजी तसा कायदाच पास झालाय म्हंत्यात. खरं काय त्ये म्हाइत नाई बुआ अपल्येला. पण असं असल, तर जरा वाइट म्हणावं की. नाइ का? http://beta.esakal.com/2009/08/16231320/international-new-sharia-law-i…