Skip to main content

नुक्ता चीं हैं गमे दिल..

लेखक संजय अभ्यंकर यांनी शनिवार, 29/08/2009 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ता चीं हैं गमे दिल उनको सुनाये ना बने... ह्या गझलची जादू अशी की तीने अनेक गायक, संगीतकारांना वेड लावले. हि मिर्झा गालीबची गझल, अनेक संगीतकारांनी चालीत बांधली. अनेक गायकांनी ती गायली. ह्या गझलच्या अनेक छटांचे संकलन करण्याचा मानस आहे. ह्या पैकी सुरय्या, नुरजहाँ, रफी साहेब व सैगल साहेबांच्या आवाजातील गझल यु ट्युब वर उपलब्ध आहेत. हि गाणी येथे ऐकता येतील. आणखी गायक, संगितकारांच्या छटा हव्या आहेत. कृपया मिपाकरांना माहीत असल्यास दुवे द्यावेत.

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय?

लेखक निमीत्त मात्र यांनी शनिवार, 29/08/2009 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
विकास ह्यांनी सुरू केलेल्या चर्चेत अधिक अवांतर नको म्हणून इथे नविन चर्चा सुरू करत आहे.. काही मुद्दे - हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? हा धर्म आहे काय? ही जीवनपद्धती आहे काय? जीवन पद्धती म्हणजेच धर्म नव्हे काय? नसेल तर जीवन पद्धती आणि धर्म ह्यामध्ये फरक काय? संप्रदाय म्हणजे काय? हिंदू संप्रदाय की हिंदू धर्म? हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा कुणाला अधिकार आहे? हिंदुत्व आणि हिंदू मधला फरक काय?

The Madonna of the carnation- लेयनार्डो द विन्ची

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 29/08/2009 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
लेयनार्डो द विन्ची ह्या गुढ व्यक्तिमत्वाबद्दल जितके लिहावे तितके थोडे. त्याची अनेक चित्र पॅरीसच्या लुव्र म्युझियममधे तसेच इतरही युरोपमधिल म्युझियममधे आहेत. असेच एक म्युझियम म्युनिकमधे आहे- Alte Pinakothek. त्यात लेयनार्डो द विन्चीने काढलेले मुळ चित्र "The Madonna of the carnation" (1478–1480) संग्रहीत आहे.

गौरी

लेखक बाकरवडी यांनी शनिवार, 29/08/2009 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती नंतर लगेचच गौरींचे आगमन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. आमच्याकडेही गौरी बसवण्यात आल्या. परंपरेनुसार आम्ही शाडूच्या उभ्या गौरी बसवतो.सर्व सजावट मी आणि माझ्या भावाने केली. तर पक्वान्नं आई आणि आत्या यांनी केली. रव्याचेलाडू,चकली,करंजी ,मोदक हे सगळे पहील्या दिवशी ! तर गौरीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होता. आमच्यात गौरी आगमनाच्या वेळी अंगणातील तुळशी वृंदावनापासुन घरात स्वयंपाक खोलीपर्यंत रांगोळीची पाउले काढली जातात आणि त्यानंतर प्रत्येक पावलावर मुखवटे ठेवले जातात.

कावीळलेल्या भींती

लेखक ॐकार यांनी शनिवार, 29/08/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला
काव्यरस

मन

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 29/08/2009 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे मन पहाटवार्‍याचे , दव होउन बोलते.. मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर... मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची मन लाट सागराची, वाट आडवळणाची मन तेज भास्कराचे,मन वार्‍याच्या वेगाचे मन अलवार सूर नभी एकटे गुंजते मन श्वास या देहात, मन पाखरु रानात मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..
काव्यरस

मात्र रात्रीची गोष्ट ....भाग १

लेखक दशानन यांनी शनिवार, 29/08/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
*** स्थळ - नेहमीचेच रात्रीचे ठिकाण. वेळ - नेहमीची 'बसायची' वेळ. पात्र - मी आणि नेहमीचा मित्र. (सुरवात नुकतीच होत असल्याने कोण काय बोलत आहे हे नीट कळत नाही, जसजसा वेळ जातो तसं नीट कळायला लागतं, अशी सुरवातीची उन्मनी अवस्था) मी - हाटेल चांगल चालायला लागलं रे... सुरवातीला आपण यायचो तर अगदी फुटकळ लोक यायचे तो- तर आता चांगले चालु आहे. फॅमिली रुम, बार, गार्डन, टेरेस वेगवेगळे भाग आहेत. जो तो आपापल्या चॉईसने जातो मी - ते बरे आहे नाही तर तुला मला पाहुन सगळे फॅमिलीवाले पळुन गेले असते तो - तर काय .. एक तर माकडाचे चेहरे आपले.. भाषा खराब मी - पण आपल्याला तोंडावर बोलतं का कुणी?

ते माझे घर

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 29/08/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
ते माझे घर घर कसे असावे याबाबत निरनिराळ्या संकल्पना प्रचलित आहेत. "पोस्टातील मुलगी" सिनेमात गदिमांनी केलेले वर्णन लक्षात राहण्यायोग्य आहे. ते आहे असेः ते माझे घर, ते माझे घर जगावेगळे असेल सुंदर असेल सुंदर ! नक्षिदार अति दार तयाचे शिल्प तयावर बुद्धकलेचे चक्रे, वेली, मूर्ती मनोहर ! अंगणी कमलाकृति कारंजे वरी अप्सरा एक विराजे झरतिल धारा ओलेतीवर ! आकार मोठा, तरिही बैठा आतुन वेरुळ आणि अजिं

गोत्र

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 29/08/2009 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते. मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही विवेकी बुद्धीला पटणारे नाही. पण गोत्रामुळे या उपवर मुलाच्या लग्नात आलेल्या अडचणी मी डोळ्यादेखत पाहिल्या होत्या.