Skip to main content

अजब कहाणी आहे ही

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 15/09/2009 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
अजब कहाणी आहे ही अजब कहाणी आहे ही कुठे सुरू कुठे सरे ही ईप्सितेही कोणती कळली न त्यास, ना मलाही ती या उजेडासोबत हा का धूर उठतसे दिव्यामधून हे स्वप्न पाहते आहे मी की जागले मी स्वप्नातून शुभेच्छा तुला की तू कुणाचा दीप जाहलास कुणाच्या निकट तू एवढा सगळ्यांच्या दूर जाहलास कुणाचे प्रेम घेऊन तू नवे जगच तू वसवशी ही सांज येवो केव्हाही मला जरूर तू आठवशील अजब तर आहेच! मात्र ओळखीची वाटतेय का, ते पाहा!!

पावस प्रवास मार्गदर्शन..

लेखक बाळ्कोबा यांनी सोमवार, 14/09/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार, रत्नागिरी जिल्ह्यातील पावस क्षेत्री प्रवासाचा बेत आखत आहे, परंतु नेमका कोणता मार्ग अधिक रास्त होईल ह्याबद्दल जास्त माहीत नाही. बरोबर वय ५०+ वा ५५+ वयाच्या व्यक्ती आहेत. वाहन स्वतःचे असणार आहे. थेट रत्नागिरी ला मुक्कामाला जायचे आहे. धन्यवाद.. (प्रतिक्रियार्थी)बाळकोबा

डोंबारी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 14/09/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो. ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका. जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट. लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट. Dombari डोंबारी १ Dombari2 डोंबारी २

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 14/09/2009 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश .

ओट्सचे लाडू

लेखक कन्चनरनदे यांनी सोमवार, 14/09/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः- १ वाटी ओट्स, १/२ वाटी पीथीसाखर, पाव वाटी तूप, वेलची पूड, सजावटीला काजू क्रुती :- प्रथम ओट्स मीक्समधून वाटने. वाटलेले ओट्स गरम तूपावर खमग भाजने. भाजलेल्या ओट्समधे १/२ वाटी पीथीसाखर व वेलची पूड घालने. या मिश्रनाचे मध्यम अकाराचे लाडू वळने.लाडूवर सजावटीला काजू लावने. हे लाडू अतीशय पोश्टीक असतात.

रंगकर्मी.कॉम

लेखक रंगकर्मी यांनी सोमवार, 14/09/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात,रंगकर्मीचा सर्व मिपाकराना मनापासुन नमस्कार. नाटक्,मराठी जीवनाचा एक अविभाज्य घटक.महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या संगीत नाटके,त्यानंतर पुरषोत्तम दारव्हेकर, वि. वा शिरवाडकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागु, विजय तेंडुलकर आणि आजच्या काळात प्रशांत दामले, भरत जाधव यांची नाटके पहातच वाढल्या. याशिवाय प्रायोगिक रंगभुमीदेखील सत्यजीत दुबे,चेतन दातार यांमुळे जोरात होती आणि आजही आहे. नाटक हा मराठी मनाला भावणारा विषय असल्याने ही नाट्यचळवळ जोमाने वाढली व गावागावात रंगकर्मी मंडळी तयार झाली.

रसूल अल्लाह आणि तो

लेखक अन्वय यांनी सोमवार, 14/09/2009 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
रसूल अल्लाह या बंदिशीचा जालावरील धागा मिळविण्यासाठी चर्चा टाकाली होती. ही बंदिश मिळेल का नाही ही शंकाच होती. ती मिळाली. त्यासाठी हुप्प्याचे विशेष आभार! या बंदिशीने मला खूप पूर्वीपासून वेड लावले आहे. या विषयावर असंख्य मिपाकरांचे प्रतिसाद मिळाले. त्यावरून रसूल अल्लाह बंदिशीवर लोक किती प्रेम करतात, हेच दिसून आले. त्यामुळे मला या संबंधीचा एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. हा किस्सा मी फारसा कुणाला सांगितलेला नाही.... एकदा रात्रपाळीचे काम उरकून आम्ही तिघेजण (त्यातील एक मिपाकर आहेत.) आत्म"शांती' करण्यास बसलो होतो. अर्थातच हॉटेलमध्ये. आमची संगीतावर चर्चा सुरू झाली.

बाली

लेखक नंदू यांनी रविवार, 13/09/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सुट्ट्यांमध्ये बालीला जायचा योग आला. तसं पुलंचं पुर्वरंग वाचल्यापासून बाली कायम डोक्यात घर करुन होतंच पण शेवटी योग यावा लागतो. यावेळी मात्र महाजालावरून विमान आणि हॉटेल बुकिंग करूनच टाकलं आणि सहकुटुंब बालीला जाउन आलो. या ट्रीपचा हा सचित्र वृत्तांत. देनपसार विमानतळावर उतरण्यापुर्वी विमानातून दिसणारा हा अगुंग पर्वत. हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे. १९६३-६४ साली याचा उद्रेक झाला होता. रामायणावरील सुप्रसिद्ध केचक नृत्यनाटिका.