अजब कहाणी आहे ही
अजब कहाणी आहे ही
अजब कहाणी आहे ही
कुठे सुरू कुठे सरे
ही ईप्सितेही कोणती
कळली न त्यास, ना मलाही ती
या उजेडासोबत हा का
धूर उठतसे दिव्यामधून
हे स्वप्न पाहते आहे मी
की जागले मी स्वप्नातून
शुभेच्छा तुला की तू
कुणाचा दीप जाहलास
कुणाच्या निकट तू एवढा
सगळ्यांच्या दूर जाहलास
कुणाचे प्रेम घेऊन तू
नवे जगच तू वसवशी
ही सांज येवो केव्हाही
मला जरूर तू आठवशील
अजब तर आहेच!
मात्र ओळखीची वाटतेय का, ते पाहा!!
लेखनविषय:
याद्या
2256
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
मस्त!
मस्तच
अहाहा !!
अरे वा! ओळखू येणारी आहेत की!