माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे!
स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले.