Skip to main content

भोंडला

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 21/09/2009 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्राचे दिवस म्हणजे हादग्याचे, भोंडल्याचे, भुलाबाईचे दिवस.
काव्यरस

अ‍ॅन्टीगनी

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 20/09/2009 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅन्टीगनी कडे वळण्यापूर्वी तीची पूर्वपिठीका पाहुयात. सोफोक्लीज च्या नाटकांबद्दल एक विचित्र कुतुहल असते.

पर्पल जार

लेखक अन्वय यांनी रविवार, 20/09/2009 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी बारावीत असताना "पर्पल जार' हा इंग्रजीत धडा होता. त्यातील चिमुकली आणि तिचा पर्पल जारसाठीचा हट्ट. हाती पैसा नसल्यामुळे तिच्या आईची तगमग, असा काहीसा या कथेचा विषय आहे. नवीन अभ्यासक्रमात हा धडा राहिलेला नाही. परंतु तो मला पुन्हा वाचायचा आहे. मी खूप ठिकाणी पुस्तक शोधले; पण निराशा! ही कथा जालावर मिळू शकेल काय? किंवा कुणाकडे त्या बारावीचे पुस्तक असल्यास ते मला विकत हवे आहे. फारच सुरेख कथा आहे ती.

"हरिश्चंद्राची फॅक्टरी"

लेखक मुक्तसुनीत यांनी रविवार, 20/09/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
आताच वाचलेल्या बातमीनुसार , यंदाच्या ऑस्कर पारितोषिकांकरता , भारतातर्फे पाठवायचा चित्रपट म्हणून "हरिश्चंद्राची फॅक्टरी" या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. परेश मोकाशी यांचे आणि या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ! बातमीचा दुवा : http://timesofindia.indiatimes.com/news/india/Harishchandrachi-Factory-…

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

लेह - लडाख -काश्मिर

लेखक विलास आंबेकर यांनी रविवार, 20/09/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे.

......वगैरेचं काय?

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 20/09/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
सोनाली माझ्या ऑफीसमधली एक सहकारी. नेमून दिलेले काम अगदी वेळेवर करायचे हई तिची खासीयत. थोडिशी अल्लड खट्याळ,इनोसंट कोणी कधी चेष्टा केली तरी खेळकरपणे घेणारी.छोट्या छोट्या गप्पातही ती मनमोकळे इनोसंट हसायची तिचा जेंव्हा इंटर्व्ह्यू झाला तेंव्हा या मनमोकल्या हसण्याने तीने तो इंटर्व्ह्यू तीने सहज जिंकला होता. ऑफिसात जनसंपर्काचे काम तिच्याकडे. विषेश करून प्रथमच आलेले क्लायन्ट ती फार सुंदर रीतीने हाताळायची. त्याना एकदम घरगुती वातावरणात आणून ठेवायची. काय अशी जादू होती कोण जाणे पण तिच्याशी बोलल्यावर प्रत्येकाला ती अगदी घरातली एखादी बहीण्/वहिनी असावी अशीच भावना निर्माण व्हायची.

भविष्यवेत्त्याना त्याचे भविष्य ठाऊक असते काय?

लेखक वेताळ यांनी रविवार, 20/09/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल हिंदु धर्म व भविष्य ह्यावर मिपावर भरपुर चर्चा व काथ्याकुट चालु असतो.आज एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. सदर बातमी लिन्क खाली देत आहे. http://beta.esakal.com/2009/09/20003121/national-divya-joshi-suicide.ht… एका ज्योतिष्याला त्याचे भविष्य नीट समजु नये ह्याचा खेद वाटतोय.का ज्यादा पैसा मिळवण्याचा हव्यास नडला? आजकाल प्रत्येकाला अशा तथागतित गुरुंची का गरज वाटते ते देखिल समजुन घ्यावे लागेल.

..पट्टराणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 20/09/2009 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
..पट्टराणी.. ------------ करु नको माझ्याकडे तु गं अशी पाठ राणी.. सोडु का ग सांग तुझ्या चोळीची मी गाठ राणी.. जीव होतो कासावीस,तू गं अशी रुसताच.. पहा माझ्याकडे आणि हास ना ग एकदाच.. तुझ्या कुशीमध्ये पुरी सरु दे गं रात राणी... राग इतुका गे आला,वर धरीला अबोला.. रात विरहात जाई शिक्षा तुला आणि मला.. बोल ना ग माझ्याशी तु..बिलगुनि घट्ट राणी... गुंफु दे गं हातामध्ये माझ्या तुझे दोन्ही हात भिडु दे गं ओठालाही तुझे मधाचे गं ओठं.. लागु दे गं सुर आता..धुंद सप्तकात राणी... दिस तर जातो जसा..रात नको विरहात.. मिठीतुनि पाहु दे ना..मंद कोवळी पहाट.. वाटे मग मी गं राजा..तु गं माझी पट्टराणी.. ------------ योगेशु
काव्यरस

`एनर्जी' आणि `टॉनिक'!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 20/09/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते. ... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते.