Skip to main content

"हरिश्चंद्राची फॅक्टरी"

लेखक मुक्तसुनीत यांनी रविवार, 20/09/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
आताच वाचलेल्या बातमीनुसार , यंदाच्या ऑस्कर पारितोषिकांकरता , भारतातर्फे पाठवायचा चित्रपट म्हणून "हरिश्चंद्राची फॅक्टरी" या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. परेश मोकाशी यांचे आणि या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ! बातमीचा दुवा : http://timesofindia.indiatimes.com/news/india/Harishchandrachi-Factory-…

वाचने 4284
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

हरिशचंद्राच्या फ्याक्टरीला शुभेच्छा! बातमी वाचताना हा उल्लेख वाचला.. आणि ह्या सिनेमाला किती कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागले असेल ह्याची कल्पना आली. :) "Harischandrachi Factory" beat off competition from 15 films including Bollywood movies like "New York" and "Delhi 6" to get selected for the honour.

चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. पहावा असे म्हणतो. बाकी चित्रपटाला शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चित्रपट बघितला पाहिजे. ऑस्करसाठी शुभेच्छा.

ऑस्करसाठी शुभेच्छा... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. काय होणार ? http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms

माझ्याही शुभेच्छा! यानिमित्ताने मुक्तसुनितरावांनी चित्रपटाची समिक्षा लिहावी हि विनंती. :)

माझ्याही शुभेच्छा ! कै. दादासाहेब फाळकेंनी काढलेल्या "राजा हरिश्चंद्र" या चित्रपटाच्या निर्मीतीची कथा यात मांडली आहे असे ऐकतो. हा चित्रपट पाहायलाच हवा. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

हा चित्रपट प्रदर्शीत झाला नाहिये आजून....नोव्हेंबर-डिसेंबर मधे होणार आहे... माझ्यातर्फेही चित्रपटाला शुभेच्छा !!

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. परेश मोकाशी यांचे आणि या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ! 'जोगवा’ या मराठी चित्रपटाला न पाहताच ऑस्कर शर्यतीतून वगळले अशीही बातमी यानिमित्ताने वाचनात आली. -दिलीप बिरुटे