पुलं, निळा कोल्हा आणि.....
पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले.
निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला.
आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला.
झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. !
तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता.
मिसळपाव
