Skip to main content

शिवाम्बूचिकित्सा मित्र मंडळ

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 02/11/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
(हे लेखन संपूर्णपणे काल्पनिक आहे)
शिवाम्बूचिकित्सा मित्रमंडळ ( पुरुषांसाठी ) वार्षिक सभा आणि नूतन सभासद नोदणीचा कार्यक्रम
सदाशिव पेठेतल्या रा.ब. कुमठेकर मार्गावरच्या जुन्या वाड्याच्या भिंतीवरची हि पाटी पाहून मला फार आनंद झाला. "चला .. संस्थेबद्दलची उत्सुकता आता फार काळ ताणली जाणार नाही " असे मनातल्या मनात म्हणत मी पाटी परत एकदा वाचून बघितली. खाली सभेची तारीख आणि वेळ ठळकपणे लिहिलेली होती.

गृहमंत्री गरजले अतिरेकी टरकले!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 02/11/2009 06:07 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5187205.cms ऐका ऐका ऐका! आपल्या पराक्रमी गृहमंत्र्यांनी पाकला कडक इशारा दिला आहे. पुन्हा हल्ला केलात तर जबरदस्त बदला घेऊ. आताच मिळालेल्या माहितीनुसार ही गर्जना तमाम अतिरेक्यांनी टीव्हीवर ऐकली आणि ते चळाचळा कापू लागले आहेत. आता ते जेहाद वगैरे न म्हणता अल्लाह करम करना वगैरे गाणी म्हणत आहेत. लवकरच ते ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणत शस्त्रत्याग करणार आहेत. कित्येकांनी आपापल्या एके४७ वगैरे बंदूका वितळवून त्यांची कुदळी, फावडी आणि नांगर करायचे आणि शेती करायचे बेत आखत आहेत!

आगे नारी - एक कोंकणी लोकगीत

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/11/2009 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यातली "ख्रिस्ती लोकगीते" गोव्याबाहेर फारशी परिचयाची नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संगीताची छाप आहे, पण मूळ ती एतद्देशीय आहेत. गोव्यातील पाककलेसारखेच हे घरोघरच्या, गावोगावच्या कलाकारांना स्फुरलेले रम्य मिश्रण आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या ख्रिस्ती लोकगीतांचा एक खजिना मला आंतरजालावरती मिळाला. वेगवेगळ्या लोकांनी केलेली संकलने सुरावटीसकट स्कॅन करून या स्थळावर चढवलेली आहेत. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यातले एक संकलन (ख्रिस्तवासी) पाद्री लूर्दीन्य बार्रेतो यांनी केलेले होते - हे नाव माझ्या ओळखीचे होते.

आघाडीच्या पक्षांचा निषेध

लेखक देवदत्त यांनी रविवार, 01/11/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते. २२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या नावाची घोषणा केली. पण आज १० दिवस झालेत तरी शपथविधी काही झाला नाही. दोन पक्षांमध्ये कोणते खाते कोणाला मिळावे (खरं तर जास्त मलई कोणाला मिळावी) ह्यावर त्यांची चर्चा चालू आहे. शपथविधीकरीत मंडपही बांधून तयार आहे. त्याचे दररोजचे भाडे वाया जात आहे. बहुतेक नेते मुंबई-दिल्ली वार्‍या करत आहेत.

ऐका .....बिडी.

लेखक मीनल यांनी रविवार, 01/11/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावचे एक सदस्य विमुक्त यांची अशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली. यात साउंड मिक्सिंगसाठी खूप स्कोप वाटला. म्हणून ही कथा निवडली आणि माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित केली . मी वापरलेले रेकॉर्डींगचे साधन उत्तम नाही.

हॅलोवीन पंपकिन!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 01/11/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या शुक्रवारी हापिसातून घरी आलो तो मुलगा धावत येऊन मिठी मारत म्हणाला " बाबा, आज हॅलोवीनचा पंपकिन कार्व करायचाय!" हो हो म्हणत त्याला थोपवला. जेवणं वगैरे होईपर्यंत चिरंजिवांनी कसाबसा दम काढला. हातांवर पाणी पडताच "मी टूलकिट काढतो!" म्हणत त्याची धाव क्लोजेटकडे गेलीच. टूलकिट म्हणजे दोन वर्षाखाली भोपळा कोरायला आणलेली छोट्या हत्यारांची एक पुडी.

आप्ले भेन्डीभावु

लेखक यन्ना _रास्कला यांनी रविवार, 01/11/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जामच पाठी लाग्ले.लिव्हा कायत्री म्हनुन. काय लिहाव ते कायच कळेना. मग मनाताल आपन ज्या सौस्थेच काम कर्तो त्येच्याविश्यीच लिहिल तर. त्येव्हड्च माहितीच आदान आनी परदान. मी पुर्वी माहाराष्ट्र अनिसच काम करत होतो. महाराष्ट्र अनिस हि नरेन्द्रजी दाभोलकरान्ची सौस्था आसुन तिचा श्या* दा* यान्च्या नुस्त्या अनिसशी कायच संबंध नाय.

"कूटलिपी - एक विचार" आणि "स्याद्वादा" या लेखांवरील विवेचनातून नाडी ग्रंथांवर प्रकाश

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 01/11/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून, मिसळपाव आंतरजालावर नाडीग्रंथांवर हेटाळणीच्या व चेष्टेच्या प्रतिक्रियांवरून वाचकांना ह्या विषयाची गंभीरता वाटत नसल्याचे लक्षात आले. म्हणून मध्यंतरी मी नाडी ग्रंथांवर विचार व्यक्त करायचे टाळत होतो. पण उपक्रम दिवाळी अंक २००९ मधील "कूटलिपी - एक विचार" या श्री. हैयोहैयैयो यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे मला पुन्हा एकदा नाडीग्रंथांबद्दल विचार व्यक्त करावेसे वाटले. नाडी ग्रंथाच्या कूटलिपी बाबत याठिकाणी काही लेखन झाल्याने येथे चर्चेला ते लावत आहे. श्री.

सुरवंट

लेखक कौतुक शिरोडकर यांनी रविवार, 01/11/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू विरलीस पंचमहाभुतात ....... ती वेळ... ती तिथी... मी गोंदलीय माझ्या मनावर..
काव्यरस

पार्टनर

लेखक कौतुक शिरोडकर यांनी रविवार, 01/11/2009 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
मेहतांची आणि माझी ओळख हॉटेलच्या बारमध्ये झाली. झालं असं की सगळेच टेबल्स खचखचून भरलेले. फक्त एका कोपर्‍यात मेहता एकटेच बसले होते. मी शक्य तेव्हढा नम्रपणा आवाजात आणून त्यांना विचारलं. "कोणी येणार आहे का ?" सीप घेता घेता थांबले मेहता. नाव नंतर कळल म्हणा. त्यानी मानेनेच नकार देत ग्लास संपवला. मी बसल्यासरशी ऑर्डर दिली. ब्रॅंड सेम होता आमचा. तेही स्मिरनॉफ घेऊन बसलेले. एकदा दारूचा ब्रँड जुळल्यावर मैत्री जुळायला वेळ लागत नाही. तशी आमच्या वयात बरीच तफावत होती. मी ३२ चा आणि ते मागच्याच महिन्यात ५५ पुर्ण करून पुढच्या वाटचालीस लागलेले. मेहता म्हणजे सुरतवरून आलेली मोठी आसामी. त्यांचा डायमंडचा बिजनेस.