Skip to main content

हिशोब

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/11/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
असाच फिर॑तोय आज स्वतःचा शोध घेत. कुठे निघालो होतो आणि कुठे पोहोचलोय याचा अंदाज घेतोय जुने नकाशे किती वेळा बदलले , त्यातल्या बदलेल्या खजिन्यांच्या जागा, यांचा हिषेब लावतोय. कैफात उधळलेले क्षण मोजतोय त्यापायी गमावलेले आणि मिळवलेले यांची बेरीज वजाबाकी करतोय हिशोब कुठेतरी चुकतोय. वजाबाकी बरोबर येतेय. पण जमेची बाजू जास्त का येतेय. अर्र आत्ता आठवले.... मी तुझ्या आठवणींसोबत घालवलेले क्षण विचारतच घेतले नाहीत. ..............विजुभाऊ

ज्यूल्स व्हर्न

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/11/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यूल्स व्हर्न हा लेखनातला अवलीया. त्याची आणि माझी ओळख झाली ती "८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा" या भा रा भागवतांच्या अनुवादीत पुस्तकातून. भौतीक शास्त्र /भूगोल यांचे नियम पाळून ज्या काळात प्रवासाची खूप साधने नव्हती त्या काळात मि.फॉग आणि त्याचा नोकर पासपार्तू ने ८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा पार पाडली त्याची साहस कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली.

बुधवारची कविता: तमाशा

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 11/11/2009 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्‍हास बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास" सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास' म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"? म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा -पुण्याचे पेशवे
काव्यरस

फॉल फेस्टिव्हल

लेखक मीनल यांनी बुधवार, 11/11/2009 04:52 या दिवशी प्रकाशित केले.
सण म्हणजे आनंदोत्सव. यात असते ती खण्यापिण्याची चंगळ, कपड्या-लत्त्याची मौज-मजा, संगित नृत्याचा आस्वाद. खर तर मानवाने सणाच्या साजरीकरणाचा काळ ठरवला तो निसर्गाच्या बदलांनुसार. पण अस म्हणण्यापेक्षा कधी कधी अस वाटायला लागत की हा निसर्गच मानवाच्या सणासूदीत उत्साहाने शामिल झाला आहे आणि मानवाला त्याच्या विविध रूपात सामवून घेऊन रंगवून टाकतो आहे. निसर्ग मानवाला मुक्त हस्ते भरभरून सुख देऊन तृप्त करत आहे आणि या समाधानातच मानव आनंदोत्स्व साजरा करत आहे. निसर्गाच्या प्रत्येक बदलाची चाहूल मानवाला काही काळ आधीच लागते आणि मग मानवही सज्ज होतो तो निसर्गाने देऊ केलेल्या त्या सुखसाठी.

दाउद २

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
दाउदा येशील कधी परतून? बोम्बस्फोट खटल्यात 'माफीचा' साक्षीदार म्हणून भ्रष्ट-ढेरी राजकारण्यान्च्या नाकावर टिच्चून शरदाच्या त्या राजकिय अन अभयाला आठवून मुम्बापुरीतिल तव वास्तुन्चा वारसदार म्हणून मुन्डेच्या त्या घोषणेची अन मुन्डी मुरगाळून दाउदा येशील कधी परतून?

दाउद १

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
दाउदा दाउदा भागलास का? दुबईच्या बेटावर लपलास का? दुबईच्या बेटावर 'कर'बन्दी तुझा तो वाडा चिरेबन्दी

असेच मनात आले...

लेखक एकशुन्य यांनी बुधवार, 11/11/2009 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री टि.व्ही समोर बसुन जेवत असताना 'ब्रेकिंग न्युज' ही पाटी बघितली, 'सुनीता देशपांडे यांचे निधन'. हातातला घास गळ्यातल्या आवंढ्या बरोबर तसाच ढकलला. वाटलं. प्रत्येक घरातला 'नारायण',वर्तमानात असुन देखील भुतकाळात जगणारे 'हरितात्या', कोकणातला 'अंतु बर्वा' ही आणि अशी बरीच मंडळी आज खरोखर पोरकी झाली. जेव्हा पासून कॉमिक्स सोडून कादंबरी हा फक्त मोठ्यांसाठी असणारा प्रकार वाचू लागलो तेव्हा प्रथम हात लावलेली ' व्यक्ती आणि वल्ली ' ही एक.

माफी आणि नुकसान भरपाई

लेखक निमीत्त मात्र यांनी बुधवार, 11/11/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेने एकट्या पुण्यात तीसेक बसेस फोडल्या. मिपाकर वेदश्री ह्यांच्या सारख्या मराठी लोकांना दिवसभराच्या कष्टांनंतर अंधारात उपाशी झोपण्याची वेळ आली. विधानसभेत झाले ते झाले त्यावर चर्चा नको पण त्यापायी सामान्य माणसांना वेठीस धरल्याबद्दल मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकांची माफी मागून मालमत्तेचे झालेले नुकसान पार्टीफंडातून भरून द्यावे असे आपल्याला वाटते का? अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.

असा अनुभव यावा म्हणूनच का?

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 10/11/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अ‍ॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले.

ग्रानोला

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 10/11/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज नवर्‍याच्या प्लँट मधे लॅब च्या लोकांना येता जाता तोंडात टाकायला ग्रॅनोला केला. त्याचा नमुना मिपाकरांसाठी. साहित्य ३ कप ओट (इंस्टंट नको) १/२ कप आक्रोडाचे तुकडे १/२ कप बदामाचे तुकडे १/३ कप मध १ टे. स्पून ब्राऊन शुगर ( नसल्यास साधी चालेल) १ टे. स्पून तेल १ टी स्पून वॅनिला १ कप सुकवलेल्या बेरीज किंवा मनुका कृती ओवन ३००F तापत ठेवा. एका १३x९ च्या बेकिंग पॅन मधे ३ कप ओट पसरुन तापलेल्या ओवन मधे ठेवा. १० मिनिटांनी बाहेर काढून त्यात आक्रोड आणि बदामाचे तुकडे नीट मिसळून परत अजुन २० मिनिटे ओवन मधे भाजा.