Skip to main content

थांबा आणि पहा-’नटरंग’ ने केलेली क्रांति!

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 08/12/2009 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही.

मलकापूरचा म्हातारा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो. मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा.

मसूर चिकन

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 07/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज जुनी वही चाळत होते. त्यात ही मसुर चिकन सापडली. दुकानात धानसाक मसालाही मिळाला. तेव्हा रविवारी यशस्वी प्रयोग केला. साहित्यः ३/४ कप मसूर; अर्धा तास पाण्यात भिजवुन, निवडुन घ्यावेत. २ स्कीन लेस बोन-इन चिकन ब्रेस्ट, लहान तुकडे करुन ३ कांदे, बारीक चिरुन २ टोमॅटो, बारीक चिरुन २ डहाळ्या कढिपत्ता मुठभर कोथिंबिर १/२ इंच आल्याचा तुकडा ४-५ लसूण पाकळ्या, सोलून १ टी स्पून हळद १ १/२ टी स्पून तिखट २ टी स्पून धानसाक मसाला १/२ चमचा गरम मसाला १ टे.

निरंजन

लेखक दमनक यांनी सोमवार, 07/12/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी म्हटलं, प्रवासात शिकलेली गाणी चिरंतन प्रवाशांच्या ओठी देऊन जावीत. मग त्यांच्या किलबिलाटातून ती गाणी सगळीकडे पसरतील. सकाळी घरट्याबाहेर पडताना ही गाणी आठवत असतील आणि संध्याकाळी परत येताना अंगभर साठवत असतील... मग एखादे दिवशी याच गाण्यांनी उजवलेल्या एखाद्या स्वरभारल्या कुशीतून मी परत जन्म घेईन आणि ती गाणी परत... नव्याने शिकेन. नाहीतरी, माझं असं काय होतं जे मी घेऊन आलो ? माझं असं काय आहे जे मी घेऊन जाईन ? पण एक मात्र नक्की. जगण्याची गाणी निरंजनपणे गात राहीन.

अजीब दास्ता हैं ये......

लेखक भानस यांनी सोमवार, 07/12/2009 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने जोर धरला होता. पहाटेच उठून माझ्या रूमची खिडकी सवयीने उघडली होती. मस्त ओले थंडगार वारे अन मध्येच पावसाचे तुषार आत झेपावत होते. जरासे कुंद वाटत होते पण मला आवडतो पाऊस. रह रहके समीर समोर दिसत होता. अरे हो, मी - दिशा. जिथे आनंद, चैतन्य भरभरून नांदत असेल तिथेच मी रमते. आयुष्याला ओझे समजून वाहणारे लोक पाहिले की फार त्रास होतो मला. मी त्यांना सरळ नजरेआड करते. ही अशी जमात आहे ना की त्यांना कोणीही कितीही समजावले तरीही ते करंटेच राहणार. तेव्हा छोड दो. हां आता अगदी जवळचे काही असे वागतात ना तेव्हा चांगली हजेरी घेते त्यांची. परवाचीच गोष्ट, रजत दोन दिवस डोक्याला हात लावून बसला होता.

पु लं ची गाजलेली वाक्य ...

लेखक संदीप शल्हाळकर यांनी सोमवार, 07/12/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे आवडते पुलं, ज्यांना आपण सगळे कलेतलं आराध्य दैवत मानतो, त्यांची आठवण म्हणुन त्यांची काही विनोदी वाक्य संग्रहीत करण्यासाठी मला आपणा सगळ्यांची मदत पाहिजे. तेव्हा आता चालु करुया या नव्या उपक्रमाला.....

कल्पवृक्ष कन्येसाठी ....

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर डिसेंबर महिने जवळ आले की दत्तजयंतीचे वेध लागत, घरात बाबांचे गुरुचरित्राचे पारायण सुरु होत असे. घरात छान भक्तिमय वातावरण असे. तसेही ते वर्षाचे ३६५ दिवस असे कारण स्वामींचा जप करणे, जप लिहिणे, लघुरुद्र, सत्यनारायण, मेहुण, सवाष्ण काही ना काही घरात सुरुच असे. बाबा खुप भाविक होते. त्यांनी गुरुचरित्र सुध्दा हाताने लिहुन काढले होते. त्यांना गाण्याची सुद्धा आवड होती. ते उत्तम पेटी वाजवत असत. त्यामुळे अधेमधे घरी गाण्याचे कार्यक्रम होत असत. लहानपणापासुन संगीत कानावरुन गेल्यामुळे का कोण जाणे पण मी गाणे शिकले नसले तरी कोण बरोबर की चुकीचे गातेय हे नक्किच कळते.

जगलो जरी मी खुप.

लेखक टुकुल यांनी सोमवार, 07/12/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता. जगलो जरी मी खुप परी ते जगणे नव्हते, विद्वतेचा किताब घेवुन हात कधीच थांबले होते पडलो न कुणाच्या कामी तो शब्दांचा बाजार होता, त्या बाजारातच माझ्या व्यक्तिमत्वाचा र्‍हास होता. परी न दाखवली मी कुणा नाराजी असुनी या अंतरी, माझ्या पिलांनीच माझी फसगत केली सारी, परी जीव गुंतला त्यात जरी झाले मजला परके, ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा करावयास मन माझे हलके, जातानाही नाही सुटतील हे बंध रेशमाचे, या मायेच्या कपड्याला, शिवणारे हात विणकर्‍याचे.. जगलो जरी मी खुप.................
काव्यरस

एका बाजेची गोष्ट

लेखक मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता. आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली.