जाता जात नाही 'ती'
जाता जात नाही ती 'जात'
दोन दिवसा पुर्वी बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन झाला. त्या वेळी निरनिराळ्या वर्तमानपत्रात बाबासाहेब, त्यांचे विचार, कार्य, आणि सध्य स्थीती ह्यावर सालाबादप्रमाणे चर्च्या झडल्या. व्रुत्त वाहिन्यांवर वाद विवाद झाले. पण मुळ ह्यातुन संवाद व्हावा हि अपेक्षा धरणे म्हणजे मुर्ख पणा आहे. असो. हे प्रकटन लिहिण्यास कारण की अश्याच एका लेखावर ('बोधिसत्वाची बांडगुळे') आधारीत धाग्यावर मी एक प्रतिक्रिया टाकली. प्रतिक्रिया थोडी अवांतर वाटली असावी म्हणुन त्यावर एका मिपाकरानी मला शालजोडीतले दिले.
अजीब दास्ता हैं ये..... मध्य
गाण्याच्या नादात..... का ठंडी हवाच्या नादात दिशा स्टेशनवर पोचली, गाडी स्टँडवर चढवून दोन नंबरवर जायचे म्हणून पुलाकडे वळली खरी पण मन काही पुढे जाईना. काळजात हुरहुर, पोटात फुलपाखरे उडत होती. " ए लडकी, आज बहोत नादान बन रही हो. नक्को करू ऐसा..... क्यूं न करू? मेरी जान तुझे तो सब पता हैं, फीर भी...?" स्वतःशीच अविरत चालणारा झगडा पुन्हा जोर धरत होता. तोच कोणीतरी हाक मारतेय असे वाटून दिशा वळली आणि पाहते तो काय समोर संपूर्ण ग्रुप उभा अन मधोमध समीर.
माझा आवडता पांढरा शुभ्र चिकनचा झब्बा, नुकतीच अंघोळ केली असावी - त्यामुळे तकाकणारा चेहरा, तेच जीवघेणे स्माईल, डोळ्यात आर्जव......
एअर ट्रॅफिक कंट्रोल
तीनेक वर्षांपुर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्या सिस्टीमच्या एका छोट्या भागाचा अभ्यास करण्याचा योग आला होता. त्यावेळी जवळ-जवळ हजार पानांइतके स्पेक वाचायची, त्या गंजीतून सुई शोधून काढायची कामगिरी टाकण्यात आली होती.
येथे मी लिहिणार आहे ते त्यातील काही मनोरंजक गोष्टींबद्दल, ज्या आपल्या सर्व-सामान्यांच्या आयुष्यात अनेकदा कळत-नकळत प्रवेश करतात. किंबहूना मी असे म्हणेन की, ह्यांच्या शिवाय आपण विमानप्रवास सुखरुप करुच शकणार नाही व विमानप्रवास जरी केला नसेल तर आजपर्यंत आपल्या डोक्यावर भरकटून (सहजा-सहजी) एखादे विमान का आदळत नाही हे समजायला ही माहिती उपयोगी ठरावी.
मेमांडू--एक अनुभव.
येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीत
मराठीसाठी काही करायचे आहे ?
मराठी अभ्यास केंद्रांचे अध्यक्ष श्री.दिपक पवार यांनी पाठवलेली काही माहिती इथे जोडत आहे. ज्यांना मराठीकरता काही करायची इच्छा असेल ते सहभागी होऊ शकतात.
व्हेज कटलेट
साहित्य :
आपल्या आवडीनुसार कोण्त्याही भाज्या बटाटा, मटार, गाजर, बीट, फ्लावर,कोबी, ईत्यादी, भाज्यांचे प्रमाण ही आपल्या आवडीनुसार.
१ चमचा आल +लसुण +मिरची पेस्ट, चवीनुसार गरम मसाला, चाट मसाला,मीट्,कोथिंबीर,१ मोठा चमचा भाजलेला रवा, तेल
क्रुती:
१)बटाटे उकडून कुस्करुन घ्या,मटार हि वाफवुन बारीक करा,गाजर आणि बीट किसुन वाफवुन घ्या
२)सगळ्या भाज्या,कोथिंबर,आल +लसुण +मिरची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला , मीठ एकत्र करा
मिश्रण सैल वाटल्यास एखादा ब्रेड स्लाईस बारीक करुन घाला.
३) ह्व्या त्या आकाराचे कटलेट करुन घ्या.
४)तव्यावर थोडे तेल टाकुन त्यावर रव्यात घोळवलेले कट्लेट शैलो फ्राय करा.
५)कटलेट तयार आह
मिसळपाव