Skip to main content

तू तेव्हा तशी ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 11/01/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती... त्या रात्री वेगळेपणाची जाणीव पूर्णपणे सरली होती ... उरले नव्हते कुठलेही पाश, न उरली कुठलीही आस ... वाटले मिटून घ्यावे डोळे ... तू असता असे पास ... भरून घ्यावा तुझा गंध ... जपून ठेवावा तुझा स्पर्श असाच होत राहावा दोन मनाचा दोन देहाचा परामर्श ... अचानक स्वप्न भंगले अन दिसली रिकामी उशी ... तुझ्याही शेजारी असेल का ग ती तशी ? नकळत माझ्या डोळ्याची कड पाणावली ... असेल का ग तुझीही उशी अशीच ओली? विषय बदलावा म्हणून कूस बदलली ... अन ह्या सगळ्यातच अजून एक रात तशीच सरली

बेत

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 11/01/2010 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते... नकळत आयुष्य मात्र वेगळीच वाट चालत होते सापडला किनारा म्हणून जरा विसावलो ... तर ते मृगजळ मला पाहून हसत होते भेदरलो शोधू लागलो परतीची वाट चाचपून पहिला आधारासाठी धरलेला हात तो हात बहुदा कधीच सुटला अन एकाकीपणाच्या नुसत्या जाणीवेने काळजाचा ठोका चुकला ... घातली साद त्या दिलाबरास पुन्हा पुन्हा उमगले नाही काय घडला गुन्हा ... वाटले संपवावे हे जीवनाचे समर तितक्यात .... दूरच्या मशिदीत घुमले अल्लाहू अकबर

इज्जत!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 11/01/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस तिरप्या धारा `बेभान'लेला आडवा वारा ओल्या मातीचा धुंद सुगंध, ..... आणि, एक लफ्फेदार सही सगळ्यातच एक `लिज्जत' असते... विदेशातले साहित्य संमेलन अध्यक्षाच्या पदाचा मान सारस्वतांच्या `कवतिका'चं भान ... आणि एक `झालर'दार मंडप ज्येष्ठत्वाला `इज्जत' असते.... ------------------

प्रेमाचा "निसर्ग"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/01/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम असावे झाडासारख्रे दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी एकमेकांना सुखाची सावली देणासाठी प्रेम असावे पहाडासारखे अढळ अचल राहाण्यासाठी एकमेकांना भक्कम आधार देण्यासाठी प्रेम असावे फुलासारखे नाजूक हळूवार फुलण्यासाठी एकमेकांना जीवापाड जपण्यासाठी प्रेम असावे नदीसारखे बेधुंद प्रणयात वाहून जाण्यासाठी एकमेकांना उत्कट प्रेमसागराकडे नेण्यासाठी प्रेम असावे हवेसारखे न सांगता अनुभवण्यासाठी एकमेकांना प्रेमसुगंध देण्यासाठी प्रेम असावे आकाशासारखे जीवनातील पोकळी भरुन काढण्यासाठी एकमेकांवर अनंत प्रेम करण्यासाठी अन या आकाशाच्या आभासात... हवेच्या
काव्यरस

काश्मिर आणि माध्यमे

लेखक विकास यांनी सोमवार, 11/01/2010 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या डिएनए च्या संकेतस्थळावर एक बातमी वाचण्यात आली: RSS may go against J&K autonomy (जाने ११, २०१०) काय आहे म्हणून उत्सुकता वाटली. तर बातमीप्रमाणे, जस्टीस शागीर अहमद समितीने काश्मिरला ऑटोनॉमस स्टेटस (मराठी?) देण्याबद्दल शिफारस केली आहे त्याला संघाने विरोध करण्याचे ठरवले आहे असे त्या बातमीतील म्हणणे होते.

ऊंधियु

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 10/01/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
ऊंधियु साहित्य : भाज्या : लहान वांगी, लहान कांदा व बटाटा, कंद, सुरण, राजळी केळी, घेवडा, तुरीच्या शेंगा, ओल्या वालाच्या शेंगा, मटार, मेथी आणि सुरती पापडी ( ही नसेल तर ऊंधियु होणार नाही.) मसाला : ओलं खोबरं, कोथिंबीर, जीरा पावडर, हळद, तिखट, ओली लसूण, मीठ, लिंबाचा रस, साखर, दाण्याचं कूट.

आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!

लेखक आनंदयात्री यांनी रविवार, 10/01/2010 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेलं सुख शोधता शोधता मी एकदा अवचित एका जुन्या लाकडी दारावर येउन थांबलो. त्या दाराची भिंत स्वच्छ चुन्याने रंगवलेली होती, दाराच्या उजवीकडे डावीकडे गेरुच्या रंगाने भालदार चोपदार काढलेले होते, दारावर एक छोटासा कोनाडा होता, आणी त्यात एक सुंदर, टप्पोर्‍या डोळ्यांची बाल गणेशाची मुर्ती होती. आजोबा पहाटे पहाटे देवपुजा झाली की या गणपती पुढेही जास्वंदाचे फुल ठेवत. दाराकडे चेहरा केला तर उजव्या बाजुला एक दगडी सोपा बांधलेला होता. दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी.

डेटोना बीच, फ्लोरिडा.

लेखक मीनल यांनी रविवार, 10/01/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
टेबल वरच घड्याळ कानात कर्कश्य गजरलं. सकाळच्या सात वाजता माझी भली पहाट झाली होती. जड पापण्या अतिकष्टाने उचलून डोळे किलकिले केले. हॉटेल रूमच्या बाल्कनीला लावलेल्या पडद्यांच्या फटीतून थोडासा प्रकाश आत डोकावत होता. खरतर उजाडताना बाहेर पाहायच होत. म्हणून तर सूर्योदयाच्या वेळी मला उठवून जागं करायची तंबी घड्याळाला देऊन ठेवली होती. आळसाला बिछान्यात गुंडाळून ठेवलं. त्यातून माझ्या शरीराला अलगद सोडवून घेऊन बाल्कनीत लोटलं. झुंजुमुंजू सकाळ रवीला साद घालत होती. तोही जरासा चुळबूळ करू लागला होता. त्या रवीशी मनातल्या मनात शर्यत लावली. "बीच वर कोण आधी पोचतय, तू की मी?

चुकामूक

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 10/01/2010 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हायचं असतं ते घडतंच' या म्हणीचा कधीकधी प्रत्यय येत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. परवाही असंच झालं. परवा म्हणजे गेल्या रविवारी. आई रत्नागिरीहून येणार होती. "मी स्वतः येईन रिक्षानं. तू कशाला झोपमोड करून येतोस,' असा तिला सल्ला. पण हा आज्ञाधारक, विनम्र पुत्र रात्री दीडला झोपून पुन्हा पहाटे पाचला तिला आणायला जाण्यासाठी सज्ज झाला. सकाळी बरोब्बर पाचचा गजर लावला आणि त्यानुसार (गजर तसाच बंद न करता) उठलोही. कार घेऊन जाऊन आईला आपल्या मुलाच्या गाडीचा आनंद घेतल्याचं कृतकृत्यतेचं समाधान देण्यासाठी बाहू फुरफुरत होते.

झेण्डा

लेखक दीप्या यांनी शनिवार, 09/01/2010 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
वा अवधूत गुप्ते !!तुझ्या दारोदार फिरणारा झेडा बघून फारच वाईट वाटले. त्या तल्या तुच उभ्या केलेल्या कार्यकरत्या हुनही तुझी अवस्था भयाण.एकदम चा बू क गोची की राव! काठी नसणारा हा एकमेव झेण्डा !