Skip to main content

चालू करा तुमचे इंजन

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/01/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
सिचूयेशन: आप्ल्या पिच्चरचा बागाईतदार नायक निसता उंडारेल हाये. त्यो नुसता इकडतिकड पुढारपन करत फिरत आसतूया. त्येच्यावाली हिरवीन बायकू लय आंग मोडून शेतात कामं करतीया. आप्ला हिरो शेतात फिरकना झालाय. तवा काय व्हत त्ये हिरवीन गानं म्हनूनशान सांगती.

"रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे".....एक झलक

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 12/01/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! दिनांक ७ जून २००९ रोजी माझे पहिले पुस्तक "रत्नपारखी शिवराय - भाग १ : बाजी पासलकर" प्रकाशित झाले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.या छोटेखानी पुस्तिकेद्वारे मी काहि वाचकांच्या मनापर्यंत पोचलो याची साक्ष देणारे अनेक फोन्स , ईमेल्स , पत्र येतात त्यावरून लक्षात येते आहे.आता "रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे" जे ८५ % लिहून झाले आहे पण गेले सुमारे सव्वा वर्ष ते ८५ % एव्हढेच पूर्ण राहिले आहे ते लिहायला घेण्याचा मानस आहे.यासाठी एक सुरेख संधी पण डोंबिवलीच्या रोटरी क्लब ने उपलब्ध करून दिली आहे - १६-१७ जानेवारीला रायगड्-प्रतापगड वारी (हो आम्हा शिवप्रेमींस

ओनियन उत्तप्पा

लेखक गणपा यांनी मंगळवार, 12/01/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी मद्राश्यांच्या प्रदेशात असताना डोसे , इडल्या, उतप्पे या पदार्थांनी अगदी उत आणला होता आणि तेव्हा पासुनच त्यांच नाव टाकल होतं. तसा मी काही यांचा द्वेष्टा नाही पण सारख सारख तेच आणि तेच खाउन जीव कंटाळला होता. आता बरेच दिवस झाले हाणुन तशी त्यांची आठवण येउ लागली म्हणुन हा प्रपंच.... साहित्यः पीठासाठी दोनास एक या प्रमाणात तांदुळ आणि उडिद डाळ कमीत कमी ४-५ तास भिजत ठेवावे. (उपलब्ध असल्यास साध्या तांदळा ऐवजी उकडा तांदुळ घ्यावा.) १ वाटी शिळा भात.

वेल

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 11/01/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
वेल पौर्णिमेच्या चंद्राला एकांताचा छळ राती एकल्या वेलीला चांदण्याची झळ .. गर्द निळ्या गारुडाचा माळभर पूर येतो काळ-वेळ विसरून वारा वेलीसोबत शहारतो थोड्या दंवासाठी आता तहानला कातळ पौर्णिमेच्या चंद्राला एकांताचा छळ... सुन्या माळा वर वेल एकटी अबोल आहे, बहरात तिच्या पाणावली अश्रुंचीही ओल आहे, हसरी कळी बनुन उमले अंतरीची कळ, पौर्णिमेच्या चंद्राला एकांताचा छळ... -- सागर लहरी ११.१.२०१०

हाका न्युडल्स

लेखक गणपा यांनी सोमवार, 11/01/2010 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
इंडो चायनीजच्या तिसर्‍या भागात परत एकदा तुम्हा सर्वांच स्वागत. आजचा मेन्यु हाका न्युडल्स!!!!!!!!!! यातल चिकन वगळ तर तर ही व्हेज डिश होईल.

एस्.टी आरक्षण साईट

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 11/01/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय रेल्वेच्या आरक्षण साईट प्रमाणेच आपल्या एस्.टी ने ही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा चालू केली आहे. त्याची लिंक या साईटवर प्रथम आपले अकांट काढावे लागते. व त्यानंतर टिकिट बूक करता येते. ठाणे-पुणे मार्गासह, दादर, बोरीवली, नाशिक, औरंगाबाद या मार्गावरील बसेसचे आरक्षणही ऑनलाइन उपलब्ध असेल. इतर मार्गा बद्दल माहिती नाही. अमोल ------------------------------------------------------------------------------------------- मला इथे भेटा

झित्रोन कुकन- लेमन केक

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 11/01/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटाआजीची खासियत म्हणजे हा लेमन केक.. साहित्य- २५० ग्राम साखर, २५० ग्राम मैदा, २५० ग्राम लोणी/तूप, ५ अंडी २ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १ चिमूट मीठ १००-१२५ ग्राम पिठीसाखर, ४ ते ५ लिंबांचा रस, लिंबाची किसलेली साल १ ते २ चमचे कृती- लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे. लिंबाची साल घालून फेटणे.

भूताच्या भूतकाळाचे गूढ प्रेम...!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/01/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
भूताच्या भूतकाळचे भूत भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!! सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!! भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो" --------------------------- गूढ प्रेम मध्यरात्री ती आली... पायवाटेवर बसली, डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून! त्या रात्री 'तो'ही आला... तीच्यासोबत यायला, स्वतःच्या जीवाला पारखा होवून!
काव्यरस

मला पुन्हा एकदा

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 11/01/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे .. मला पुन्हा एकदा चिंब भिजायचे आहे ... पुन्हा चोरायचा आहे डब्यातून लाडू, पुन्हा विनवायचे माळ्याला 'एकच कैरी पाडू' ? पुन्हा रंगवायचे आहेत हात ... निळे शाईमध्ये पुसायचे हात शर्टाला ... खेळायच्या घाईमध्ये पुन्हा धरायचा हट्ट कुत्राच्या पिल्लासाठी, आणि चोरायचे मावळे ... आपल्या किल्ल्यासाठी पुन्हा घालायची शिळ तिच्याकडे पाहून .. थांबायचे पाहत ... ती पाहते का वळून ... पुन्हा जायचे पार्किंग मध्ये चुकवून नजरा ... पळून जायचे ठेवून तिच्या गाडीवर गजरा .... होते स्वप्न व्हावे मोठे ... कधी नसावे लहान ... वाटे जिंकुनिया जग व्यापावे पंचप्राण आता उमगत नाही ...