Skip to main content

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

लेखक संजीव नाईक यांनी मंगळवार, 19/01/2010 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति जीवनात साहित्याप्रमाणे संगीतकलेला असाधारण स्थान आहे. संस्कृत सुभाषितकाराने "साहित्यसंगीत कलाविहिन; साक्षात् पशु: पुच्छविषाणहीनः" असे म्हणून गायनी कलेचे महत्त्व मान्य केलेले आहे. ललित कलांत तर संगीताचे साधन असलेला स्वर हा सूक्ष्म असल्यामुळे या कलेची साधना श्रेष्ठ मानली जाते. या कलेचा प्रभाव चराचर सृष्टीवर पडतो व म्हणूनच या कलेच्या खर्‍या आराधकांवर जातीची, देशाची व काळाची बंधणे घालणे अन्यायाचे आहे. हे सर्वमान्य आहे. सूक्ष्म अशा संगीतकलेला साधना ही तितकीच प्रखर व एकाग्र असावी लागते.

लोहगड..माझ्या नजरेतून

लेखक मानस् यांनी मंगळवार, 19/01/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
तशी कॉलेजमधे असताना थोडीफार भटकंती केली आहे पण मधल्या ७-८ वर्षात नोकरी,मग कुठुंब या व्यापात भटकणं विसरून गेलो होतो.मिपावरचे भटंकतीचे लेख वाचुन स्फुरण चढलं होतं...ठरवलं बस् !

((त्यांच्या लग्नाची पत्रिका आज घरी आली))

लेखक Nile यांनी मंगळवार, 19/01/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'त्यांच्या' लग्नाची पत्रिका आज घरी आली, गालात हसत आम्ही उरलेल्यांची संख्या मोजली, संख्या पाहुन आमचा पहिलाच ठोका चुकला, त्रास नको म्हणुन औषधाचा पेला लगेच भरला, दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती, समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती, त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती, 'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला, वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला, थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती, दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती, विषय बदलुन आम्ही लगेच बॅचलर्स पार्ट्या आठवल्या, पुढचा नंबर
काव्यरस

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/01/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन व लेखकाचे बाह्यरुप हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात. असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे?

साधा माणूस या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 18/01/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या साधा माणुस या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची छायाचित्रे देत आहे. या काव्य संग्रहाला विशेष प्रस्तावना ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांची लाभली आहे, हे मी माझे परम भाग्य समजतो. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये दूरदर्शनचे अभय मोकाशी, विख्यात कवी अशोक बागवे, अशोक लोटणकर, कवयत्री डॉ. अनुपमा उजगरे, साहित्य त्रैमासिकाच्या संपादिका सुहासिनी किर्तीकर इत्यादी. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याची सांगता काव्य संध्येने झाली. गोखले यांची कविता हा त्यांचा उदगार आहे, माझ्या कवितेशी त्यांच्या कवितेची नाळ जुळते म्हणुन मी आलो.

Pride and Prejudice?

लेखक अमितकुमार यांनी सोमवार, 18/01/2010 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/special-report/Pride… Times of india मध्ये नुकत्याच प्रसिद्ध ह्या लेखात लेखकाने बिहारी पणाचा गर्व व्यक्त करून, त्यांचा इतर राज्याच्या विकासात किती महत्व पूर्ण वाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला , पण ह्या लेखाला प्रतिकिया देताना वाचकांचा तोल गेला आणि विना कारण मराठीला मध्ये आणण्यात आले. मराठी माणसावर अनेक खालच्या दर्ज्याची टीका केली.

नववधु

लेखक अनिरुद्धशेटे यांनी सोमवार, 18/01/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
नववधु हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता तोच हात मेन्दीने तेव्हा रन्गला होता नथनीचा तुझ्या त्यावेळी डउलच न्यारा होता गालावरिल लालीचा रन्ग लाजरा होता डोळ्यांमधे निरागसता पराकोटीची जपलेली गोश्ट होती माझ्या प्रेमाची तव ओ लपलेली
काव्यरस

पिक्चरच्या xxx घो

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 18/01/2010 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वन बॉल टू गो अ‍ॅन्ड फोर रन्स टू विन !! इति हंपायर उवाच सामना जिंकायला ४ धावा मात्र सिनेमातल्या हिरोचे शतक पुर्ण व्हायला पाहिजेत ६ धावा. उत्सूकता आहे ती आपला तेंडल्या शतक करतो का नाही याची ! संघाचा विजय झाला काय आणि नाही झाला काय ? प्रत्येक जण आता काय होणार या उत्सूकतेने नख खात आहेत. पण शिनिमाचा हिरो तेंडूलकर ( मियांदाद म्हणायला पाहिजे काय त्याला ?) मात्र अपेक्षेप्रमाणे आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुढे सरसावत सिक्सर मारतो ती ही एवढ्या जोरात की सांताक्रुज विमानतळावरुन नुकतंच उड्डान केलेले जेट विमान थोडक्यात बचावते.

शोध सुप्त गुणांचा!

लेखक अभिशेक गानु यांनी सोमवार, 18/01/2010 04:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस मी मिपा वाचतो आहे..मिपा मुळे आणि माझ्या अजून एकदोन मित्रांच्या ब्लोग मुळे मला पण काही तरी लिहायची स्पुर्ती मिळाली ..हि मी ऐथे नमूद करू इच्छितो. हा असा पहिलाच प्रसंग आहे..कि ज्यात मी काही आलेल्या अनुभवातून मी काही तरी मुक्त लेखन केले आहे, जाणकार मीपा वाचकांना नम्र विनिती आहे .लेखन सुधारण्या साठी योग्य त्या सूचना जरूर कार्याव्यात ..ज्याचा मला पुढे अजून काही व्यक्त करण्यास मदत करतील..धन्यवाद! काही दिवस तरी एकटे राहावे..! गेले काही दिवस या विषयावर लिहेन म्हणत होतो..

चिपाड

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 18/01/2010 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती.