Skip to main content

बाँबस्फोट ,सुरक्षा आणि गुप्तचर संस्था

लेखक चिरोटा यांनी मंगळवार, 16/02/2010 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षात आपण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला पाहतो आहोत्. मुंबई ,दिल्ली,जयपुर्,हैद्राबाद्,कोइम्ब्तोर्,कोलकाता ...आता पुणे सगळीकडेच पोलिस,राज्य/केंद्र सरकार हतबल.'हयगय केली जाणार नाही' वगैरे ठरलेली भाषा,मंत्र्यांचे चौकशीचे आदेश्,निवृत्त अधिकार्‍यांची समिती,त्यांची पोलिसदलाला 'आधुनिक' बनवण्याची शिफारस. मग अडते कुठे? जवळपास अशा प्रकारच्या बातमीत 'केंद्रिय गुप्तचर संस्थांनी आधीच इशारे दिले होते' अशा प्रकारची वाक्ये हमखास आढळतात्.गेल्या काही दिवसांत अशा संस्थांविषयी इंटरनेटवर काही माहिती मिळते का बघितले. पण भारतिय संस्था भलत्याच गुप्त निघाल्या. अमेरिकेच्या सी.आय्.ए.

श्रीवर्धन हरिहरेश्वर

लेखक Manish Mohile यांनी सोमवार, 15/02/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, मिपा वरचे माझे हे पहिले लिखाण. मुळचा मुम्बईचा असलो तरी नोकरीच्या निमित्ताने गेली 13 - 14 वर्षे बाहेरगावी असतो. खूप वर्षानी कोकणात श्रीवर्धन हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. तिथूनचे काही फोटो. http://picasaweb.google.com/manishmohile/HariHareshwarDec2008?feat=dire…

कंपार्टमेंट

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 15/02/2010 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर 'अ' शी मैत्री व्हायचे काहीही कारण नव्हते. एका अत्यंत जवळच्या मित्राने करुन दिली. हळु हळु मैत्री वाढली. एकत्र बसणे उठणे होउ लागले. मैत्री घनिष्ठ झाली. एकमेकांशी रोज बोलणे होउ लागले.

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....(आमचे मॅनेजमेंट गुरू)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 15/02/2010 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ आय टी मध्ये आल्यापासून खूप "जार्गन" ऐकायची सवय झालीये बघा. एकतर आपण स्वस्तात कामं करून देणारे नव्या जमान्याचे "बाबू" आहोत हे मान्य नसणारी (अथवा मान्य करायची इच्छा नसणारी) लोकं रात्रंदिवस शब्दकोष घेऊन आपल्या फुटकळ आत्मसन्मानाला गोंजारण्यासाठी असे जड-जड शब्द शोधून काढतात. प्रोजेक्टवर राबणारा इसम "रिसोर्स" असतो....

चिकन साते

लेखक गणपा यांनी सोमवार, 15/02/2010 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी , काय म्हणता कसा झाला विकांत? या विकांताला काही मित्र घरी आले होते. थोडीफार आचमन झाली.

काळ्या घोड्याचा उरूस!

लेखक नीधप यांनी सोमवार, 15/02/2010 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी २०४५ 'दर वर्षी थंडीच्या मोसमात मुंबईनगरीमधे फोर्ट परिसरात काळ्या घोड्याचा उरूस भरतो. तर्‍हेतर्‍हेचे खाद्यपदार्थ, भिरभिरी, मुखवटे, इतर खेळणी, टिशर्ट, कपडे, दागिने, मातीच्या उपयोगी वस्तू याची भरपूर रेलचेल असते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. विशेषतः शनिवार रविवारच्या दिवशी तर मुंगीला शिरायला जागा उरत नाही एवढी गर्दी होते. काळा घोडा ही देवता तांत्रिक प्रकारची आहे. चित्रविचित्र प्रकारची, विविध वस्तूंपासून बनलेली शिल्पे वाह्यल्याने ही देवता प्रसन्न होते.

युनिकोडी मोडीचा मसुदा व आवाहन

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 15/02/2010 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुघड सुबक अक्षरवळणे जपणार्‍या मोडी लिपीस युनिकोड मध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. मिशिगन विद्यापीठातील डॉ. अशोक पाण्डेय यावर काम करत आहेत. प्राथमिक मसुदा आपणास येथे सापडू शकेल. मोडी चे युनिकोडीकरण निर्दोष व्हावे याकरिता मोडी प्रेमी व तज्ज्ञांकडून सूचना/ टीपण्ण्या अपेक्षित आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/02/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… (या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या

मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 14/02/2010 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आत्ताच परततोय गेट वे ऑफ इंडियाहून. आज व्हॅलेन्टाईन डे ना? तसंही काही काम नव्हतं. धंदा आजकाल थोडा डाऊन आहे. नुसतं घरी बसून काय करणार? त्यातून रैवार. मग मी देखील गेलो होतो फिरायला माझ्या एका मैत्रीणीसोबत. .व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला! गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी तीही आली होती मला भेटायला. त्यातून तिचा आज वाढदिवस. मी तिच्याकरता मेट्रोच्या क्यानीकडचे छानसे मावा नेले होते. आम्ही दोघं गेटवेला एक छानशी जागा पकडून बसलो. सुंदर हवा, गेटवेवरचा आल्हाददायक वारा. मी तिला हॅपी बर्थडे म्हटलं. तिनं तिचं ते नेहमीचं जीवघेणं स्मितहास्य केलं! तिथेच आसपास एक फिरता भेळवाला घुटमळत होता.