Skip to main content

बाळकृष्ण आणि बाळशिवा खेळत बसले होते............... (काल्पनिक)

लेखक मंगेशपावसकर यांनी सोमवार, 01/03/2010 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
बाळकृष्ण आणि बाळशिवा खेळत बसले होते............... (काल्पनिक) लहानगे हे मित्र देव जरी असले तरी निरागसतेने इतर लहान मुलांसारखे अंगठा चोखत लडिवाळ स्मित, प्रसन्न यत्किंचित असे देवहास्य करत अंगणात खेळत बागडत एकांमेकापाठी धावत तर कधी एकमेकाशी अबोल राहून मं..... मं....... करत.......कधी कान्हा आपल्या बासरी संगे खेळत राही . कधी शिवा आपल्या डमरू वाजवून खिकळत हसे.... कल्पना करा किती सुंदर दृश्य असेल ना ते??... असेच खेळता खेळता बोलू लागले, दादा ब्लंमा दादा ने तल एवले मोठुले जग निर्माण केले ना....

मैत्री

लेखक गुपचुप यांनी सोमवार, 01/03/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..
काव्यरस

नानाजी देशमुख गेले.

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 01/03/2010 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांच्या समोर ऊभ राहील्यावर नजर आपोआप पायकडे जावी असा एक महर्षी नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. सारी सुखं आणी अमाप सत्ता हातात येण्याची संधी आयुष्यात मीळुनही व्रतस्थपणे तिकडे पाठ फिरवुन समाजाच्या सगळ्यात शेवटच्या घटकासाठी काम करणारा आणि कधीही त्याचं श्रेयही न मागणारा हा योगी. त्यांच्या स्मृतीला अनेक प्रणाम.

झणझणीत

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 01/03/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आज रंगपंचमीच्या निमित्ताने माझे हे रंगीत उद्योग.

भिंत

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 01/03/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य आता हातभर वर आला होता. हवेतला गारवा केव्हाच निघून गेला होता. आणि सावकाशपणे विटा ठेवून त्यावर चुना लिंपणाऱ्या चंद्र्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमलेले मला दिसत होते. 'गावली गं, माज्या जाल्याला मासोली गावली गं.' चंद्र्याचं गाणं उजाडल्यापासनं चालू होतं. भाड्या येऊन गेला तेव्हा थोडा खंड पडला होता तेवढंच. पण आता त्याच्या गाण्यालाही थोड्या कंटाळ्याची झाक आली होती. घोल्याला बहुतेक इतकी वर्षं त्याच्याबरोबर काम करून त्याची सवय झाली असावी. मधनंच चंद्र्या आपल्याला झेपणार नाही एवढी तान घ्यायला गेला की क्षणभर आठी यायची आणि मान थोडीशी हलायची इतकंच. अशाच एका तानेनंतर घोल्या वैतागून म्हणाला.

बेरंग होळी!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 01/03/2010 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
आली रंगीबेरंगी होळी पण झाली आहे महाग पुरणपोळी झाल्या महाग तांदूळ अन डाळी महागाई सर्वांचे कानपीळी रिकामीच आहे सामान्यांची झोळी... आली रंगीबेरंगी होळी पण आहे मनी दहशतीची भिती काळी नेत्यांची राजकारणी खेळी जातो जनतेचा बळी कधी सरेल दहशतीची रात्र काळी...?
काव्यरस

होळी..

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 01/03/2010 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तअश्वांचा लगाम सुटला, दाही दिशा झाकोळल्या तमदैत्याचा नि:पात करावया नीशापती अवतरला फाल्गुन शुक्ल पुनव आजी, सण होळीचा आज दिन तेजाचा, करुया नमन अग्निदेवाला रचली ही रास शुष्ककाष्टांची वेढुनी ओंडक्याला, धुप, कापूर, तुप घालुनी वडवानल प्रज्वलिला, सुवासिनी घालिती रींगण पाण्याचे, नेवैद्य पोळीचा श्रीफळ वाढवुनी अग्निनारायण तुष्टविला धगधगती ज्वाळा, गजर ढोलताशांचा तांडव करीती लवलवत्या जीव्हा कळीकाळही थबकला आसमंत अवघा निनादला, महाध्वनी बोंब जाहला पाहुनी खेळ भावनांचा, मृत्युसुध्दा गहीवरला घाली सांगड निसर्गाशी, अमुल्य ठेवा संस्कृतीचा ईथेच घडले शिवराय आमुचे, विश्वसांगे तो जाणता राजा धगधगत्या होळीतुन श्री

जेवण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/03/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं. लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय? आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे. तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील? बाकीचे मेंबरं काय हो, गप जेवतात अन जातात. तुमचे कसे सगळे वेगळेच आहे. म्हणून तर मी तुम्हाला निरनिराळे पदार्थ देते, खावू घालते. इतरांना देत नाही असले काही. अहो, तुमच्याकडे आम्ही काय जेवायला येतो का नुसते? पोट पुर्ण भरले तरच जेवणाची मजा आहे.

जीवनाश्यक गोष्टी..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/02/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येथे आपापल्या जीवनावश्यक गोष्टींची यादी प्रत्येकाने देणे अपेक्षित आहे.. माझ्यापासून सुरवात करतो. आपणही अवश्य सांगा - मधुबाला, लता, किशोरदा, यमन, भीमण्णा, बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज, सचिनदा, पंचमदा, शोले, हृषिदा, गुलजार, मदनमोहन, मिसळ, मासळीचं जेवण, श्रीखंड, पान-चुना-तंबाखू... या माझ्याकरता जीवनावश्यक गोष्टी आहेत.. आपल्याही अवश्य सांगा.. :) सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

लावणी - खास होळी निमित्त

लेखक sur_nair यांनी रविवार, 28/02/2010 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेली संक्रांत आली बाई होळी हो नाही काही तुमचा पता कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो सन भाग्याचा, आहे फार मोठा घरला या धनी, राग आता सोडा तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो दिस उन्हाळी, सोसवेना उन किती पुसावं, घामाघूम अंग आग लावी राती, चंदनाची चोळी हो तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे विझली होळी अन, राख उरं मागे, रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो ही लावणी मीराबाईंच्या " केनो संग खेलू होरी, पिया त्यज गये है अकेली" या वरून स्फुरली.
काव्यरस