Skip to main content

भारतीय महिलांविषयीचे विनोद

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 06/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
  • आपल्या मते विनोद चांगला असावा.
  • विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
  • विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही.

ज्या वेळी तुम्हि एकटे असता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/03/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता? फावला वेळ कसा घालवता? मी पुस्तक वाचतो.. वा आवडति गाणी ऎकतो

दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 06/03/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच , तसे नसते तर जगातला कुठलाही मुस्लिम तरुण अफगाणिस्तान , इराक वा काश्मीर - पॅलेस्टाईन ही कारणे दाखवून घातपातास का पुढे सरसावतो ? सुशिक्षित उच्चभृ मुस्लिम तरुण ( संगणक अभियंता - १ लाख रुपये महिना पगार ) जिहादी हिंसाचाराकडे का आकर्षित होतात ? उल्फा , नक्षल, लिट्टे इ. आंदोलने बव्हंशी त्या त्या भागातील समस्यांपुरती त्यांच्या सीमित होती.

मराठी ब्लॉग

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 06/03/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम ५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रांत साजरा झाला. श्री. दिनकर गांगल यांनी या संकेतस्थळाची थोडक्यात पण चांगली ओळख करून दिली. श्री.गांगल आणि ग्रंथाली यांच्याबद्दल मनात जे आदराचे स्थान आहे त्याला साजेसे असेच हे संकेतस्थळ असावे असे त्यावरून दिसले. ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र झाले. 'ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी' हा त्याचा विषय होता. त्यात वेगळ्या प्रकारे उद्बोधक अशी माहिती मिळाली.

मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो................एवढंच

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 06/03/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या , माझा लेख वैयक्तिक टीका करत असेल तर कृपया फक्त त्यांचे नाव काढून टाकले असते तर बरे झाले असते, मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो. कधी कुणाचे अंधानुकरण करत नाही माझ्या लेखांवर माझे नाव घेऊन टीका करणार्यांवर तुम्ही काय कारवाई कराल ते मला जाणून घ्यायचे आहे असो मला माहित नव्हते कि मिपा वर नवीन व जुन्या खाते धारकांवर भेद-भाव केला जातो. आपले जाल म्हणून आपणास तटस्थ मानत आलो. घोर निराशा झाली या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी. मंगेश पावसकर

मी आणि नारायण भंगी

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी शनिवार, 06/03/2010 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अर्धे बालपण एका छोट्या गावात गेले. आमच्या गावात टोपली संडास होते. टोपली संडास म्हणजे पत्र्याच्या मोठ्या तेलाच्या डब्ब्याची एक बाजू कापून दिवस-दोन दिवस विष्ठा जमा करण्यासाठी बनवलेले भांडे. आमच्या वाड्यात एकमेव संडास होता आणि चार भाडेकरू होते. ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर रोज गावभर फिरत असे व या डब्ब्यांतील घाण एकत्र करून घेऊन जात असे. या ट्रॅक्टरच्या ड्रायवरचे नाव नारायण होते. तो, त्याची बायको आणि एक म्हातारी हे गावभर फिरून मैला गोळा करण्याचे काम करत असत. नारायण - सतत बिड्या फुकणारा, अर्धवयस्क मिशी असलेला, मधला पडलेला दात सोडून सगळीकडे तांबारलेला - येता जाता आम्हा मुलांकडे कौतुकाने पाहत असे.

अपरिचीत किल्ले: अनघई आणि म्रुगगड

लेखक बज्जु यांनी शनिवार, 06/03/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
सफर अपरिचीत किल्ल्यांची: अनघई आणि म्रुगगड आमची जोडी तशी ठरलेलीच. मी आणि सुजीत साठे. एकदा ट्रेकला जायचं ठरलं कि फारसं कोणाला न विचारता बाईक काढतो आणि सुटतो. या वेळी सफर करायची होती दोन अपरिचीत किल्ल्यांची ते म्हणजे अनघई आणि म्रुगगड. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन थोडे वेगळे झालेले आणि नेहमीच्या हौशी ट्रेकर्सपासुन जरा दुर्लक्षिलेले असे हे किल्ले. शनिवारी पहाटे बाईक काढ्ली. पनवेल, खालापुर मार्गे जांभुळपाड्यापासुन ५ कि.मि. असलेल्या कळंब गावात आलो. कळंब गाव तसं लहानच. ४०-५० घर असावीत जेमतेम.

अंतर

लेखक sur_nair यांनी शुक्रवार, 05/03/2010 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंतर शब्दांच्या सुंदर जाळ्यात मला अडकवू नकोस वचनांच्या खोल बंधनात उगा बांधू नकोस बोटात बोटे गुंफून दोघे हवे तेवढे फिरू मनगटाभोवती मात्र कधी नकोस हात धरू सहज सुटण्याइतकी दोघांतली सैल गाठ नको पण श्वास कोंडेल असा घट्ट गळफासही नको रागावू नको, माझी प्रेमाची कल्पना जरा निराळी आहे फक्त भावनांचा रस नाही अनुभवाचं सारही आहे शेवटी काही असले तरी तू 'तू' आहेस, मी 'मी' आहे दोघेमिळून 'आपण' असलो तरी….