Skip to main content

चित्रपटांची व सिरियल्सची गमतीदार शिर्षके!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 17/03/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.) आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.

मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 17/03/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसंगः आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा: एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं. दुसरी: खलबत्ता म्हणजे? पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे? शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही. पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात.

समर्थ

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 17/03/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
संहिता जुनी नवीन अर्थ मागते अन्यथा विसर्जनास गर्त मागते आज कोणत्या अटीत गुंतणार मी? (भेट नेहमीच ती सशर्त मागते!) कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी, ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते तोच घेउनी फिरे रिता कमंडलू, काय त्या दयाघनास व्यर्थ मागते? स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो, भूमि ही असा नवा समर्थ मागते

उत्तर -दक्षीण

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 17/03/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बरेचदा एखाद्या ठीकाणची माणसे आपल्या नजरेतून जोखत असतो. आपली नजर म्हणजे अगदी आपला दृष्टीकोन...परस्पेक्टीव्ह्.....आणि त्यातूनच मग शेरे मारत असतो. आणि मग आपण आपले ठरवतो अमूक भागातले लोक अमूक प्रकारचे असतात..... उदा :सरदारजी शूर असतात बीहारी माठ असतात दिल्ली कडचे लोक फार बनेल असतात. पंजाबी गोडबोले असतात , मारवाडी लोक चिकट असतात , आगरी लोक विनोदी असतात वगैरे वगैरे आणि त्यावरून मग त्या त्या भाषीक्/भौगोलीक लोकांशी कसे वागायचे ते ठरवतो.

माझी हॉस्पीटल भरती

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 17/03/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला. तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला.

पुस्तकविश्व.कॉम - मराठी वाचकांसाठी नवीन संकेतस्थळ. BETA 1.0

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 16/03/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com). मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे. पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.