Skip to main content

"नेत्यास इशारा"

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 09/04/2010 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
विडम्बन काव्य 'देवा तुझे किती सुन्दर आकाश ' वर आधारित : नेत्या तुझा किती | भकास प्रभाग | लुटोनी बोडका | झाला ऐसे ||१|| उजाड़ शिवार | कोरडे कालवे | घोडे नाचविले | कागदांमाजी ||२|| भुकेली लेकरे | खंगली हो गुरे | शेतकरी झुरे | उदासोनी ||३|| कर्जाचे डोंगर | डोईजड झाले | रस्त्यावर आले | सारे लोक ||४|| तुम्बडी भरोनी | हाव आटपेना | भस्म्या, क्षयरोग | माणुसकीचा ||५|| नको आता तुझी | फोल आश्वासने | नादी न लागणे | चोरट्यान्च्या ||६|| तुझी प्रकरणे | लटके बहाणे | भारता ग्रहणे | ग्रासियेले ||७|| --- अरुंधती कुलकर्णी http://iravatik.blogspot.com/

त्सुनामी मनांतले ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 09/04/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भारतातील सगळ्या टी. व्ही. चानेल ला एकाच बातमीने ग्रासले होते इंडोनेशियांत त्सुनामी येणार ! झालं ! सगळ्यांचे मला इंडोनेशियांत फोन जप रे बाबा ! कुठे बाहेर जाऊ नकोस बुधवारी ! वगैरे वगैरे ! ! माझ्या मनांत मात्र विचारांचे वादळ सुरु होते विदेशात नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्या इतर अस्वस्थ भारतीयांप्रमाणे ……………………. ! त्सुनामी मनांतले ! ! ! त्सुनामी ! त्सुनामी ! ! येणार ! येणार ! सगळेच अस्वस्थ, भितिग्रस्त. आले, आले ! गेले ! ! हु..S...S...श्य ! !

चांदोबाच्या जगात... राजमाचीला

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 09/04/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे... मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं...

मदत हवी आहे...

लेखक चिऊ यांनी शुक्रवार, 09/04/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मला थोडी माहिती हवी आहे.... चेन्नई मधे रहाणे, खाणे कसे आहे, घर भाडे... ही माहिती कोणी देऊ शकेल का??

फुलव पिसारा नाच :)

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 09/04/2010 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेल्या एका मेलमधले हे फोटोज...अतिशय सुंदर वाटले, आवडले म्हणून शेअर करत आहे :)
आभाळात छान छान सात रंगी कमान कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

मुद्राराक्षसाचे विनोद (संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/04/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत आहे, मी बनवलेल्या आत्तापर्यंयच्या "मुद्राराक्षसाच्या" विनोदांचा संग्रह !! प्रस्तावना: पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा. तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे.

कोडे सोडवा-पाच नाणी

लेखक चिरोटा यांनी शुक्रवार, 09/04/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
५ नाणी आहेत्.त्यातील तीन खरी आहेत तर दोन खोटी.दोन खोट्या नाण्यांमध्ये एक नाणे खर्‍या नाण्यांपेक्षा जड आहे तर दुसरे खर्‍या नाण्यांपेक्षा हलके आहे. तराजु फक्त तीनदा वापरुन खोटे जड आणि खोटे हलके नाणे कोणते ते ओळखा. भेंडी

नाच नाचूनी नाचू मी किती

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 09/04/2010 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाच नाचूनी नाचू मी किती
पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून || थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ|| सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा || नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१|| काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम || मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२|| थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती ||

केळफुलाचे कबाब (वडे)

लेखक गणपा यांनी गुरुवार, 08/04/2010 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला घरा मागच्या आवारात फेरफटका मारत असताना केळीच्या झाडांना लोंगर लागलेले दिसले. तेव्हाच इरादा पक्का केला की या आठवड्यात आईकरते तसे केळफुलाचे कबाब /डाळवडे करुन पहायचे. काल दुपारी लंच ब्रेक मध्ये घरी गेलो. चण्याची डाळ भिजत घातली. आणि एक बोंड (केळफुल) तोडुन आणल. संध्याकाळी ऑफिस मधुन आल्यावर केळीच बोंड निसुन घेतल. बाकिच्याही सामानाची जुळवाजुळव केली.