लेखककानडाऊ योगेशुयांनी रविवार, 18/04/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
.....घडावे असे काही.....
------------------------------
घडावे असे काही सुंदर आणि गोड..
वक्षावरी सुटावे माझ्या वेणींचे पेड..
लागावी चाहुल त्याला.. किणकिणत्या कंकणाने....
हलकेच जाग यावी..
लेखकपाषाणभेदयांनी रविवार, 18/04/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक गिअर मेला
एक गिअर मेला.
तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो.
मी म्हणतो तो गिअर मेलाच.
असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला.
दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार?
तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे.
बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन.
आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्यांची.
तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये.
अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच.
लेखकस्वप्निल मनयांनी शनिवार, 17/04/2010 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मित्रा तू माझ्याकडून दुखावला जात असतोस,
पण कसे समजावू तुला,
असं करताना मला किती त्रास होत असतो
तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे,
मित्रा तू तर माझा जीव की प्राण आहेस
तुझ्यासाठी त्याग करायला मला काहीच वाटत नाही,
कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे
तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच असह्य आहे,
तू म्हणशील तर आयुष्यावर पाणी सोडायला तयार आहे
आप्ल्या मैत्री आड कधीच काही नाही येणार,
पण, प्रत्येक संकटाच्या वेळी तू विरू आणि मीच जय होणार
लेखकविंजिनेरयांनी शनिवार, 17/04/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १
केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ).
लेखकchaitralicयांनी शनिवार, 17/04/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलाशी संवाद .....
ब र्ड वॉचिंग'च्या ग्रुपबरोबर गेल्या महिन्यात आम्ही "फणसाड' अभयारण्यात गेलो होतो. भारीतला कॅमेरा, ट्रायपॉड, दुर्बीण.. प्रत्येकाने जय्यत तयारी केली होती. प्राणी दिसण्याची अपेक्षा ठेवली, की ते कधीच दिसत नाहीत. अर्थात ते आपल्याला लपून पाहत असतात; पण दर्शन देत नाहीत. या वेळी आमचा उद्देश एकच होता, अतिशय दुर्मिळ झालेल्या पांढऱ्या गिधाडांना पाहायचे. तिथला मित्र वनअधिकारी हरिश्चंद्र नाईक आमची वाट पाहत होता. गिधाडांचे घरटे सहा किलोमीटरवर असल्याने गाडीतूनच जायचा निर्णय झाला.
लेखकझुम्बरयांनी शनिवार, 17/04/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा चित्रपट आयुष्यावर काय परिणाम ठेवून जातो हे कधी कधी न समजण्या इतक आपण त्यात वाहवत जातो, असाच काहीसा अनुभव मला दोन दिवसान पूर्वी आला... खर तर या चित्रपटाचा खूप गाजावाजा झाला होताच ... पण तो मी पाहीला आणि खरच आपण २१ व्या शतकात आहोत का?