Skip to main content

ही लपवाछपवी कशाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 21/04/2010 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
टोपणाचं काम फक्त बूचासारखं, बाटलीबंद करून आतल्या द्रावाची ओळख लपविण्यापुरतं ! मी म्हणतो हे झाकण आपल्या ओळखीला तुम्ही लावताच का म्हणून ? अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण ! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्‍या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण ! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघांची ती डरकाळी व्हावी,मांजराची मँव मँव नाही ! मग कशाला हे वाघाचं बेगडी कातडं पांघरता? ही लपवाछपवी कशासाठी? अरे स्वतःची ओळख ठासून सांगा.. अशी पुळचट अन् हसण्यावारी नेणारी नावे धारण करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व दुभंगू देऊ नका. जे बोलायचंय ते स्वतःच्या खऱ्‍या ओळखिनिशी बोला.

मुंज

लेखक प्रभो यांनी बुधवार, 21/04/2010 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.' त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची. माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे.

दिलीपकुमार आणि चंदेरी वर्ख निघालेले अन्य कुणी....

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 20/04/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका धाग्यावरील दिलीपकुमारच्या उल्लेखाने , एकेकाळच्या टॉपच्या असलेल्या या अभिनेत्याच्या नाण्याची आजकालची किंमत काय असावी याचा अंदाज आला. या निमित्ताने लोकप्रियतेचे तात्कालिक स्वरूप , व्यक्टींच्या आवडीची व्यक्तीसापेक्षता या सर्वांबद्दल विचार दाटून आले. इतर अनेक गोष्टींप्रमाणे दिलीपकुमार या नटालाही या गोष्टी लागू होणार हे निश्चित होतेच. परंतु , त्याबद्दलच्या मतभिन्नतेच्या संदर्भात इतके टोकाचे ऐकायला मिळावे हे रोचक वाटले. दिलीपकुमारबद्दलच्या विरोधी शेरेबाजीकरता पवारसाहेबांचा चित्रपटविषयक धागा उघडून पाहता येईल. त्या नटाची योग्यता वर्णन करणारा सन्जोप राव यांचा खालचा परिच्छेद वाचनीय आहे.

पिंडविधी आणि कावळा ~ दोन अनुभव !!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी मंगळवार, 20/04/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
२१ व्या शतकाच्याबाबतीत असे म्हटले जात आहे कि विज्ञान कल्पनेपेक्षाही जास्त प्रगती करणार आहे आणि संपूर्ण जगच आता एक छोटेसे खेडे वाटावे अशा रीतीने जुळले जाणार आहे किंबहुना ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरु झाली आहे असे म्हणण्यासही प्रत्यवाव नसावा.

रेड सन च्या निमित्ताने

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 20/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

लादेन म्हणतो चेपेन चेपेन..

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 20/04/2010 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
(संदिप-सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची माफी मागून) लादेन म्हणतो चेपेन चेपेन, दाऊद म्हणतो चेपेन चेपेन. न्याय खोटा, कोर्टं खोटी, कायदाच म्हणतो चेपेन चेपेन..! हल्ला होतो अतिरेक्यांचा मंत्री बदलत बसतो सूट. दिल्लीवरुनी येता कोणी उचलत बसतो त्याचे बूट. बूट म्हणाले मंत्र्याला आणिक त्याच्या संत्र्याला, सुटला नाही 'बुश'सुद्धा डावा, उजवा फेकेन फेकेन..! 'कमळा' नाही सुगंध उरला, 'पंजा' देतो नुसतीच थाप 'इंजिन' पळते मारित शिट्ट्या, घोळामध्ये 'घड्याळ' - 'चाप' महाराष्ट्राची धरती रे परप्रांताची भरती रे अबू चालवे सायकल सायकल, लालू धरतो लालटेन लालटेन..! मी बापूंना मारुन डोळा, भरतो माझा पेला रे जो प्याला तो
काव्यरस

भांडवलशाही

लेखक इनोबा म्हणे यांनी मंगळवार, 20/04/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि दुर्बीटणेबैंची भांडणशब्द भांडवलशाही मधाळ वाणी॥१॥ कैक आमिषे ठायी ठायी॥२॥ कुटील निती पांढरपेशी॥३॥ लाल-शहांची नुसती वळवळ॥४॥ टवाळ फौजा हीन व हिणकस॥५॥ हिरव्या नाण्याची व्यर्थ हि खणखण॥६॥ कोण कुणाचे कुणा कळेना॥७॥ सोयीतून ही केवळ अडचण||८|| बाकी चालू देत...

तिरडी बांध

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 20/04/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : शुचिची चांदणशब्द तिरडी बांध करकचून||१|| खांदे चार भारवाही||२|| चिता जराशी निट रचा||३|| काडी लावता पेटेल धडधड||४|| दीर्घउसासे दु:खकल्लोळ||५|| सोडून माती सरिता सागर||६|| पंचत्वात करा विलिन||७||

गोड शिरा

लेखक पर्नल नेने मराठे यांनी मंगळवार, 20/04/2010 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे तरी रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे. तसेच माझ्याकडे २ कढया व एक कुकर ही सर्वात मोठी भांडी आहेत तर कसे म्यानेज करु? कुकरात एवढा शिरा होइल का? मार्गदर्शन करा.