नाडी नाडी नाडी
आजकाल मिपावरती नाडी शब्द आला की नाडीवादी आणि नाडी-काफीर लगेच बाह्या सरसावून पुढे होतात...(बाकीचे पॉपकॉर्न घेउन जवळचे झाड पकडतात.)
परवाच कुठल्याश्या धाग्यावर जगातील सगळ्या लोकांच्या नाड्या केंद्रात उपलब्ध आहेत असे कुणीसे लिहिल्याचे वाचून डोक्याची चक्रे फिरायला लागली....
"याचा अर्थ अत्ता पर्यंत मेलेल्या लोकांच्या पण नाड्या असणार......."
आणि मग प्रश्नही निर्माण व्हायला लागले.....
जे लोक मरणपावलेत त्यांच्या नाड्यांचे हे नाडीकेंद्र वाले लोक काय करतात?
कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही. ती नाडी म्हणजे त्या केंद्राला एक प्रकारची अडगळच...
मिसळपाव