Skip to main content

शरदिनी

लेखक दशानन यांनी रविवार, 23/05/2010 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
अगम्य असे शब्द घेऊन शब्द फाडतेस नवे नवे र ला ट, ट ला र जोडून विश्व उभारु पाहतेस नवे 'शर' शब्दांचे चालवून 'दीन' करु पाहतेस ब्रम्हचार्‍यास म्हणे शब्दाचे छल तुझे करती वेडे अनेकांस म्हणे चित्रविचित्र भाव नवे त्यांना वाटते काव्यविश्व नवे स्वप्नात देखील काव्य ते करती म्हणती डिनर करु संगे सखे पुण्यनगरी भेटू एकदा निवांत सये शब्दांच्या छलातून आयडीमागे लपलास तू वेड्यासारखा नको नको म्हणत असता केला वार तु ब्रम्हचार्‍यावर वेड्या रे शरदीनी सारखा गजब ढाहला...लपवे तोंड असे ही तो वेडे होऊन आयडी निरखे नवे नवे.. शर शब्दांचे चालवून तू 'दीन' करु पाहतेस ब्रम्हचार्‍यास म्हणे
काव्यरस

पुदिना पुलाव

लेखक अरुंधती यांनी रविवार, 23/05/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बासमती तांदूळ - १ कप (मी नेहमीचा साधा तांदूळ वापरून केला) बटाटे - २ पुदिना पाने - २५ खोवलेला नारळ - ३ टेबलस्पून हिरव्या मिरच्या - ६ ते ७ (मी त्या ऐवजी १० मिरीचे दाणे वापरले) आले - अर्धा इंच हळद - पाव चमचा

आदरणीय राहुल गांधी यांचे चरित्र

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 23/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील जनता प्रगल्भ आहे. भारतातील लोकशाही तर भलतीच प्रगल्भ आहे. या प्रगल्भ लोकशाहीच्या परंपरेनुसार आज जवळजवळ प्रत्येक ज्येष्ट पुढार्‍याची कन्या, पुत्र, भाचे, पुतणे भारताच्या सेवेत मग्न आहेत. पण त्यात क्रमवारी लावायची ठरवली तर राहुल गांधी यांचा क्रमांक वरचा आहे. आणि दोन क्रमांक बिटिया प्रियांकाचा आहे हे कुणीच अमान्य करणार नाही. अशा वेळी राहुलजी : भारताचे महानायक हे चरित्र लायब्ररीत दिसले तर कोण बरे वाचणार नाही? श्री माणिक लाल आणि नील घोटे ह्या समर्थ लेखकांनी ह्या भारताच्या तारणहाराचे चरित्र लिहिले आहे. ते लवकरच विक्रीस येत आहे.

दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारी पौर्णिमा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 23/05/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आगामी काळात होणार्‍या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्‍यांसाठी केला आहे. या घटना अशा - - दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत ६अंश३२मि. वर होणारी पौर्णिमा - दिनांक ११ जुलै २०१० रोजी सायन कर्क राशीत १९ अंश २३ मि.

व्यभिचार- पाप आणि पुण्य???

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 23/05/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे... चीन्तोपंतांच्या चिंता सोसून वैतागलेली राधाबाई तिच्याच ऑफिसातील हर्शल बरोबर फिरत असते. तो तिला हसवतो, खेळवतो. ती खुश आहे... तोही! ही नमुनेदाखलची उदाहरणे सत्यकथा आहेत.(नावे बदलली आहेत.) नवरा बाहेरख्याली झाला त्याचे कारण घरातच कुठेतरी सापडते.

झोंबी

लेखक जयवी यांनी रविवार, 23/05/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव ह्या नावाला “नटरंग” सिनेमामुळे आता वलय प्राप्त झालंय. त्यामुळे “पुस्तक-मित्र” च्या लायब्ररीत त्यांचं “झोंबी” पुस्तक दिसल्याबरोबर लक्ष वेधल्या गेलं. पुस्तक उघडल्याबरोबर “झोंबी” ह्या पुस्तकाला मिळालेले पानभर पुरस्कार दिसतात त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढते. त्यात पुढे पु.ल.देशपांड्यांची प्रस्तावना…….मग काय विचारायलाच नको. त्यांनी त्या प्रस्तावनेला नाव पण इतकं सुरेख दिलंय….! “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड” ! ह्या नावामुळे नक्कीच काहीतरी जगावेगळं असेल ह्याची कल्पना येते.

पुणेरी (सर)मिसळ...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 23/05/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेलमध्ये उपलब्ध असणारया शेव, चिवडा आदी खाद्यपदार्थाँची भेसळ म्हणजेच मिसळ. ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली की एक पाव दोन तुकडे झालेच म्हणून समजा! त्यातही मिसाळांची मिसळ पुढ्यात असेल तर विचारायलाच नको. वाढता वाढता कधी पोतंभर पाव अनेकांच्या उदरांत शिरून पावन होतात हे मिसाळांच्या पिसाळांनाही कळत नसायचे. पिसाळ महाशय मिसाळांचे सख्खे मेहुणे असले तरी दोघांची दुःखे वेगळीच असणार हे उघड आहे! कारण पिसाळ महोदय मिसाळांकडे वाढपी, आचारी, घरगडी अशा स्वरुपाचे हरकाम करणारे हरगडी होते.

पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 23/05/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान' लेखक : डॉ. वसंत गोवारीकर. अनुवाद : सुधा गोवारीकर. सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण. खूप आशेने वाचायला घेतलं.

(न्हाउन ओले केस घेवून)

लेखक मनिष यांनी रविवार, 23/05/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
हेहे....आमची प्रेरणा पाषाणभेद यांची ही कविता आणि पाचवीला पुजलेली रविवारची कामे आणि त्यात होरपळणार्‍या उल्हसित चित्त्ववृत्ती तथा आमची (हरवलेली) अगाध प्रतिभा! ;) न्हाउन ओले केस घेवून सर्दी होईल की तुला शिंकानी मग बेजार होशील, त्रास नुसता मला| जा पटकन टॉवेल घेऊन, केस सत्वर कोरडे कर तेल लावून, भांग पाडून चहा पिऊन घे की कपभर| घरात झालाय नुसता पसारा, त्याचे आहे का काही तुला? सुट्टीची आहेत कामे ढिगभर, त्रास नुसता मला| - मनिष शीघ्रक(ड)वी ;)
काव्यरस