Skip to main content

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/05/2010 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या) सिच्यूऐशन: हिरो्+ हिरॉइन. दोघे बाहेर निसर्गरम्य वातावरणात आलेले आहेत. चालः लावलेली आहे. एखाद्या वेळी युनळी वर टाकेन. (खालील गाण्यात तो अन ती च्या जागा बदलल्या तरी काही अर्थात फरक पडत नाही. ) गाण्याच्या दुसर्‍या आवृत्तीत जाणीवपुर्वक काही बदल आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. (लग्नपत्रिकेत नाही का लिहीत की आहेर आणू नये. जेवणाचा आस्वाद घ्यावा तसे.
काव्यरस

अस्तित्वाचा पुरावा!

लेखक भोचक यांनी सोमवार, 24/05/2010 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्‍यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही.... --------------------------------------- मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू.

चित्रमानपत्र (भाग १)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/05/2010 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जसे आपले वर्तमानपत्र रोजच्या "खर्‍या" घडलेल्या घटना आपल्यापर्यंत पोचवते, तसेच .... प्रस्तुत आहे- चित्रपानपत्र.. म्हणजे काय? असे विचारता? सांगतो.

केव्हा तरी ...

लेखक मनीषा यांनी सोमवार, 24/05/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला तुटलेल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला । शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला । सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला । मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला । काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात उंबर्‍यात या माझा, पाय कसा थांबलेला ।

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/05/2010 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा जवळी मज करा होवू निसंग आता बाजूस करा हो कमरबंद ||धृ|| कितीक दिसानं येता आज घरा डोळं लावूनी वाटं उभी अशृ नाही थारा कसर काढा आता जल्माभरची मी संगती असता करा लढाई बेधूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||१|| तुम्ही जरी शत्रू मारीले, धुळ चारीले तुरे खोवीले, बिल्ले लाविले छातीवरी काय कामाची अशी मुलूखगिरी होईल सवत करील दोघात अंतर रूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २४/०५/२०१०
काव्यरस

इंद्रायणीकाठी

लेखक फटू यांनी रविवार, 23/05/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याचा दिवस होता. गुरुवार. नेमका आठवडयाच्या मध्ये आलेला. एक दिवसाच्या सुटटीचं काय करावं हा प्रश्नच होता. आता तुम्ही म्हणाल पुण्यातले थियेटर काय ओस पडलेत? घ्यायचं कुठल्या तरी पोरीला घ्यायचं आणि मस्त ई स्क्वेअरला जायचं. निदान सिटीप्राईडला तरी जायला काहीच हरकत नाही. हाय काय ना नाय काय. पण प्रॉब्लेम असा हाये की ना आपण पोरीबाळींच्या वाटेला जातो ना आपल्याला पिच्चर बगन्यात यिंटरेष्ट हाये. असो. गावी घरी जावं तर जायचे दिडशे आणि यायचे दिडशे असा तीनशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करायला जीवावर येतं. दुसर्‍या दिवशी यायचं ठरवावं तर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो.

नवनिर्माण समिती

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे. १. नवनिर्माण समिती या समितीने मिसळपाववर असलेल्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास करावा आणी त्यांतील त्रुटी शोधून काढाव्यात. तसेच मिसळपाववर कोणत्या तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत याचाही आढावा घ्यावा. मिसळपावचे रुपरंग बदलण्यास वाव असेल तर तसेही सुचवावे. काही नविन सुविधा देता येणे शक्य असल्यास त्यांच्या अहवालात तसा उल्लेख करावा. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो लोकाभिमुख होईल, आणी नंतर अहवालातील सुचवण्यांनुसार बदल केले जातील.

नवीन संपादक

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावचा वाढता व्याप लक्षात घेता या लेखाद्वारे मिसळपाववर तीन नवीन संपादकांच्या नावाची घोषणा करतो आहे. १) रामदास २) छोटा डॉन ३)निखील देशपांडे या आधीच्या संपादकांप्रमाणेच हे सुध्दा मिसळपाव.कॉम वरील संपादनाच्या कामात असतील. त्यांनी सक्रिय काम करावे ही अपेक्षा आहे. लवकरच मिसळपाव मध्ये काही बदल घडणे अपेक्षीत आहे. त्या योगे सध्याचे संपादक मंडळ सक्रिय सहभाग देत आहेतच. आता या नवीन सहकार्‍यांमुळे कामाला गती येईल.