Skip to main content

भारत पाकीस्तान सामन्यादरम्यान!!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 19/06/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आताच भारत जिंकला पाकीस्तानबरोबर!छान मॅच झाली. शेवटीसुद्धा हरभजन जाताना शोएब अख्तरला चिडवुन गेला,त्यानेही उत्तर दीले,काहीसे हतबल झाल्यासारखे! सामन्यादरम्यान गंभीर व पाकीस्तानी विकेटकीपर अकमलमधे बाचाबाची झाली. भारत-पाकीस्तान संबंध बघता खेळाडुंनी असे मैदानावर वाद करुन जनसामान्य लोकांत एकमेंकाबद्दल तेढ वाढवणे योग्य नाही अस वाटत. राजकीय वैर जरी कायम राहणार असेल,तरी सामान्य माणूस खेळाडुंमधील बाचाबाची पाहुन संबंध सुधारण्याबद्दल विचार तर करणार नाहीच(विचार करुही काही फायदा नाही,कारण कुत्राची शेपूट ती वाकडीच राहते)......................पण येथील,भारतातील लोकांमधे दोन धर्मात तेढ वाढेल हे निश्चित! तेव्हा

लावणी: सोन्याची अंगठी मजला आणुन द्या

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 19/06/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या
तुमची माझी प्रित जडली आठवण राहू द्या प्रितीची निशाणी म्हणून सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||धृ|| न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे) साडी चोळी आहे मजला नको दुसरे काही श्रॄगांराची टिकली बांगडी उगाच मागत नाही सोनाराकडे आजच जावू या, नको की उद्या सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||१|| न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे) राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही कशाला कधी केलं नाही कमी घाटदार
काव्यरस

स्टॉप अनदर भोपाल..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/06/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
१) हे मराठी संस्थळ आहे याची कल्पना आहे, पण तरीही हा धागा अपवाद समजला जावा अशी विनंती.. २) स्वाती बांदेकर ह्या व्यक्तिला मी ओळखत नाही पण विषय महत्वाचा आहे म्हणून, आणि सर्वांच्या माहितीकरता म्हणून मला आलेले त्यांचे विपत्र मी येथे डकवत आहे.. ------------------------------------------------------------------------------------------- from swatibandekar@gmail.com reply-to swatibandekar@gmail.com to tatya7@gmail.com date 19 June 2010 12:41 subject Stop Another Bhopal Hi

१ विषय, २ लेख, ३ संकेतस्थळे आणि ४-५ दिवस - एक प्रयोग

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 19/06/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना मला अचानक कधीतरी लेखन करायची उबळ यायची. त्या वेळेला एकादा कोरा कागद हाताला लागला आणि कोणतेही विघ्न आले नाही तर तो पेन्सिलीने अथवा शाईने काळानिळा होत असे. ही लेखनाची ऊर्मी थोड्या वेळानंतर ओसरायची. पण आपल्याकडे इतरांचे किती लक्ष आहे हे पाहणे हा स्वभावातला स्थायी भाव होता. त्याचाच एक भाग म्हणून आपले लिखाण किती लोकांनी वाचले याबद्दल उत्सुकता वाटायची. पण भिडस्तपणा हाही मनातला दुसरा एक स्थायी भाव असल्यामुळे मी आपणहून त्याबद्दल कोणाला विचारत नसे. दुसरे बालपण सुरू झाल्यानंतर पहिल्या बाल्यावस्थेतल्या कांही गुणांनीही डोके वर काढणे सुरू केले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 19/06/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका: मी मुंबई विद्यापीठाशी संलग्न एका प्रथितयश महाविद्यालयातून बीएमएस (Bachelor of Management Studies) ही पदवी मिळवली आहे.

“ रात्र यौवनांत ”

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 19/06/2010 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
“ रात्र यौवनांत ” गंध सुगंधि, परिचित वारा, आभासले, आली प्रिया, प्राजक्त बरसले आज नभातून, चंद्र साक्षीला अन उभी प्रिया.. स्पर्शून पाहीन तुज आस होती ही जिवनी आज सामोरी तू अशी जाग आली स्वप्नातुनी “ दूर इतुकी का उभी ” ? आज जवळी असूनही ये अशीच मज समिप याद राहील रात्र ही रात आहे यौवनांत अन अधिरता ही अंतरी लाज हृदयीं का वृथा जाईल वाया रात्र ही आज बहरू दे प्रितवसंता, फुले गुलाबी, धुंद प्रितिचे, जतन करू या सदैव हृदयीं क्षण सोनेरी अन गंध प्रितिचे. निरंजन वहाळेकर
काव्यरस

कोल्हापुरी तडका!!!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 19/06/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
परवा कोल्हापूरला गेल्तो... जाताना, प्रवासातच, आठवणींची जुळवाजुळव करून ठेवली होती... कोल्हापुरात जायचं म्हटलं, की मला बर्‍याच वेळा `सत्यवादी' आठवतो... ते तीनचार रंगाचे, उभे पट्टे असलेलं पहिलं पान, आणि त्यावरच्या मस्त मथळ्यांच्या बातम्या... त्यातले खास कोल्हापुरी शब्द... ते आठवतच सकाळी कोल्हापुरात उतरलो. रेस्ट हाऊसवर गेलो, आणि जस्ट फ्रेश होऊन भायेर पडलो. मस्त पाऊस पडून गेल्ता...

झाकिर नाईक

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 19/06/2010 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे. डॉ. झाकिर नाईक यांना इंग्लंड मधे येण्यास बंदी अशी. कोण आहेत हे झाकिर नाईक ? डिएनएने असे लिहले आहे की '... Zakir Naik, 44, will not be allowed to enter the country due to his 'unacceptable behavior' ... ' त्यांचे हे अनअ‍ॅक्सेप्टेबल बिहेविअर काय आहे/होते ? या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी आणि या विषयावर उहापोह होण्यासाठी हा काथ्याकुट.