Skip to main content

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 02/07/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.

संदेश

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 01/07/2010 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या क्षितिजावरुनी संदेश कुणाचा येतो? हा किरण कुणाचा डोळां, ती नजर आपुली देतो? सृष्टीची तुटली नाळ हा कोण दवंडी पिटतो? उगवता सूर्य विश्वाचा हा कोण भुपाळी गातो? उपजला कधी, नसताना सदसद् वा अस्ती नास्ती? जन्माची ज्याच्या वेळ, वेळाच्या जन्मापरती आदीम क्षणांचा साक्षी, अदृष्ट पाहिले म्हणतो सत्याच्या खटल्यामध्ये हा कोण पुरावा देतो? सांकेतिक भाषा याची हो अर्थ गवसता त्रास खटल्याची तेव्हा पडते ही नवीन तारिख खास याला न तयाची खंत, हे गाव निरक्षर, झाले! जाईल पुढिल मुक्कामा, वा त्यापुढल्याही, चाले कालाच्या आदीपासुन, क्षितिजाच्या अंतापरती संदेश पसरतो आहे, एक साक्षर शोधत जगती

पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवणे योग्य?

लेखक दीपक साळुंके यांनी गुरुवार, 01/07/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यातच युपीए सरकारने इंधन दरवाढ केली हे एव्हाना सर्वांना माहिती आहेच. मात्र याचबरोबर सरकारने एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवण्यात(Deregulation) आलेले आहे. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याप्रमाणे चढ उतार होतील त्याप्रमाणे पेट्रोलचे दर चढतील/उतरतील. फ्री मार्केट. डिझेलच्या बाबतीत मात्र सरकारने partial deregulation केले आहे. डिझेलचे दर बाजारभावाच्या जवळपास निश्चित करण्याची मर्यादित स्वायत्तता केंद सरकारच्या मालकीच्या इंधन विक्री कंपन्यांना दिली आहे.

ती

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/07/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो.

विष्णुगुप्त २

लेखक पुष्कर यांनी गुरुवार, 01/07/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त-१) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता.

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 01/07/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : १. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा. २. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत. वि. सु.

कृष्णपिसे

लेखक झुम्बर यांनी गुरुवार, 01/07/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ रीत होतंय आणि मोतीचूर सांडतय तरारून धरा आलीये आणि काहूर उठतय सावळभूल उठलीये कृष्णपीस लागलाय यमुनेच्या पुरापलीकडे मन वेड् धावतंय सरीबरोबरी भिजता भिजता सुरातही चिंब होतेय लाघव त्याच्या बासरीच जीवघेण छळंतय अशी ही निळी मेघभूल मला पुरती वेढतेय "इथेच आहे तो" भास असा सारखा देतेय चांदण्या शिवाय अवघं आकाश श्याममय झालंय मलाच तो गवसेना पण आभाळ त्याने व्यापलाय वर्षेसारखी तुटून तुटून मीही मनभर ओसंड्तेय कृष्णंगहिरे रूप साजिरे ठाई ठाई शोधतेय आणि अचानक मला कसली चांदण मिठी पडली आणि माझी ओळखा सगळी त्याच्यामध्ये विरली सापडला माझा कृष्णसखा अन मी मुरली झाले आभाळ रिते होतच होते मी कृष्णं ओठात
काव्यरस

(कित्तीदा)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 01/07/2010 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
बुधवारी मी प्यायलो कितीदा तारेत मी टंकलो कितीदा! त्यांची नजर, त्यांचेच व्यनी जालात मी मुरलो कितीदा! मागितली मी तिच्याशी मयतरी मालकांस मी णडलो कितीदा! दिले धडे मी संतुलनाचे डिलीटूनी मी टाकले कितीदा! त्याचे पोट, त्याचे स्थूलसे सत्यात मी लाथाडले कितीदा --पुण्याचे पेशवे १५ तास ३१ मिनिटे, तात्याच्या कविते पश्चात
काव्यरस

नाट्य महोत्सव २०१०

लेखक रंगकर्मी यांनी गुरुवार, 01/07/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
रंगकर्मी .कॉम करत असलेला आणखी एक उपक्रम महोत्सवाबद्दल ६ महिन्यापुर्वी रंगकर्मी .कॉम सुरु झाली . सर्व रंगकर्मीना एक व्यासपीठ मिळावे असा त्यामगाचा हेतु होता . व तो पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले . रंगकर्मीला जगभरातुन वाचक मिळाले. त्यामुळे नाटकाला खर्‍या अर्थाने ग्लोबल करण्याचा प्रयत्न झाला . या काळात प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती , साप्ताहिक साधना च्या दलपतसिंग येती गावा या विशेषांकाचे सह्प्रकाशन असे अनेक उपक्रम आम्ही राबवले . या सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला .