Skip to main content

अभिनंदन

लेखक बाबुराव यांनी रविवार, 04/07/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
जालावरील मराठी लेखन लेखक यायच्या वैशिष्ट्याचा आढावा घेणारा 'मराठी ब्लॉगजगत आंतरजालावरील चविष्ट मिसळ' दै.लोकमतमधील मंथन पुरवणीत लिव्हणारे आणि मिपावर वावरणारे अभिनय कुलकर्णी यायचे मनःपूर्वक अभिनंदन...! मिपावरील तात्या अभ्यंकर, रामदास, मधुकर,राजे, छोटा डॉन आणि सिझनल अंक काढणारे प्रमोद देव यायचे कवतुक लेखात वाचाला मिळीन. या बरुबर मराठी संकेतस्थळे, मराठी जालीय लेखनाचा चांगला आढावा लेखकाने घेतला हाय. सर्वांनी लेख जरुर वाचावा.

ह्याला बोलतात निळे डोळे!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 03/07/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही महीन्यांपुर्वी 'एका' जागी गेलो होतो,पहील तिकडे सारख जाण असायच्,आता नाही.तेव्हा मित्रांबरोबर बसलेलो असताना हे मांजराच पिल्लु सारख पायाशी यायच् व कपड्यांना दातात पकडुन मांडीवर येउन बसायच.मी थोडावेळ गोंजारल की लाडात येउन तिथेच झोपायच्. :) .मी वैतागुन त्याला जोरात उचलायचो व दुस-या मित्राकडे द्यायचो तर ते परत माझ्याकडेच यायच.मित्राने बिस्कीट दाखवल तर माझ्यापाशी बसुन तोंड पोहचेल एवढच तोंड वर करायच व दुर पकडल तर ते घेण्यासाठी पुढे सरायच नाही.तेच बिस्कीट मी पकडल की ते तोंडात पकडायला माझ्या मागेही यायच!!

कोण अर्जेंटिना? धन्यवाद!

लेखक मेघवेडा यांनी शनिवार, 03/07/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची ४-० अशी अक्षरशः कत्तल केली, कोपर्‍यातून काही आवाज आले, "ऑस्ट्रेलिया काही तितकी स्ट्राँग नाही." बरं ऑस्ट्रेलिया स्ट्राँग नाहीतर नाही, नॉकआऊट फेरीत इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला, तर "इंग्लंड म्हणजे काय नुसती टीम ऑफ चॅम्पियन्स. ब्रिटिश मीडियाने मोठे केलेले खेळाडू ते. ती कसली स्ट्राँग टीम. छ्यॅ.." असे प्रतिवाद झाले! मग "अर्जेंटीनापुढे कसला निभाव लागतोय जर्मनीचा.. हॅहॅहॅ..
विशेष

महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान्........रायरेश्वर!!!!!!!!

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 03/07/2010 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या महाराष्ट्रात ज्याला रायरेश्वर माहिती नाही असा माणूस विरळा. जर कोणी असेल तर तो कमनशिबिच.... मी रायरेश्वरला आजवर दोनदा गेलो. माझ्या सुदैवाने म्हणा किंवा मित्रांच्या दुर्दैवाने, दोन्ही वेळेस एकटाच होतो. या वेळेस मुक्काम करायचा ठरवला. थोडे तहान्-भूक लाडू घेउन आणि नेहमीच सोबत करणारा दोस्त्....माझा Camera. सन्ध्याकाळी ४.३० ला बाईक ने पायथा गाठला आणि माझा फोटोग्राफीक प्रवास सुरू झाला. माझा मीच असल्यामुळे कोणी टोकणारे नव्हते. रमतगमत, नीरव शांतता पीत (क्लिक हा आवाज सोडल्यास) मी निघालो. (शिवाय गडावर महाराज आणि मावळे होतेच :)). रात्री पुजार्‍याकडेच मुक्काम केला.

एक विचित्र अनुभव ...

लेखक sagarparadkar यांनी शनिवार, 03/07/2010 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, गेले अनेक दिवस मिपावर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा वाचत होतो. त्या अनुशंगाने मला आलेला एक विचित्र अनुभव शेअर करवासा वाटतो. साधारण २००३-४ च्या सुमाराची गोष्ट आहे. मी आणि माझे काही मित्र अनेक रविवारी फर्ग्युसनमागील हनुमान टेकडीवर पहाटे पहाटे जायचो आणि नंतर एफ. सी. रोडवरील 'वैशाली' हॉटेल मधे नाश्ता करत असू. त्यावेळेस वैशाली हॉटेलमधे एक म्हातारा कन्नड भाषिक माणूस येत असे. बहुदा त्याची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसावी.

अवलिया को गुस्सा क्यो आता है ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 03/07/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन. "हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है " मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते.

बीज...

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 03/07/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलो असा सचैल, मी पावसात पुढच्या, या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे. जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे, अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे, नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे. फिरल्या नभी ग्रहांच्या, वक्रीच आज छाया , अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा, आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे. जगतो असा सदैव, स्वप्नात त्या उद्याच्या, अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या, मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.
काव्यरस

असच काहीसं

लेखक नेहमी आनंदी यांनी शनिवार, 03/07/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निर्ढावलेला श्वास अंतरंगात कोंडतो आहे उसळलेला अश्रू सांडण्या साठी तळमळतो आहे शकले माझ्या मनाची झाली..... होतील अजुन ही........ भाव मनीचा सामोरी पोचण्या अडखळतो आहे कसे रोखू या आत्म्याच्या तडफडीला जाता जाता श्वास का घुसमटतो आहे चाहुल कुणाची लागली........ का लागली........ परतीची वाट आता घरंगळती आहे... कानात गुज तुझी माझ्या झंकारु दे ओठातले स्मित माझ्या तुझ्या नयनात दिसु दे साद घातली मी त्या परतीच्या वाटेला धावत ही आली ती माझ्या धरुन हाताला घुसमट, तडफड सोडुन श्वास ही मोकळा झाला अनिवार भावना तरी ही अडखळली ग तुझ्या पर्यन्त पोचण्याला.... प्रसन्ना जीके
काव्यरस

प्रलय

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 03/07/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय......... " येते “ म्हणून सांगून गेली, परतुनी ना आली पुन्हा. वाट पाहुनी जीव शिणला, दाटल्या अन्तरी यातना. परतीच्या वाटेवर तुझ्या, सजविला आसवांचा ताटवा . जाहले निर्माल्य त्याचे, येशील तू केधवा ? अनमोल निर्माल्य हे गंगेत कुठल्या वाहवू ? महापुराचा प्रलय नंतर, एकला कसा मी थोपवू ? निरंजन वहाळेकर
काव्यरस