Skip to main content

गंभीर विनोदी चर्चा (संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 05/07/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे --ही तीन मजेदार व्यक्तीमत्वे. या तीघांचे जे प्रताप किंवा संवाद (की वाद) असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा" तर आपला 'विनोद विरंगुळे' एकदा सहज रस्त्याने जात होता. एका एस. टी. डी. बुथवर तो अचानक थबकला. खिशात हात घालून पैसे आहेत का ते तपासले. अचानक आनंदला. बुथवर 'आनंद अवकाळे' बसला होता. आनंदः काय रे विनोद! कसे काय? आज एकदम आनंदात? नाव विनोद असून तू नेहेमी गंभीर असतोस. आज आनंदी आहेस. ते कसे काय? विनोदः तू जरा थांब. मला फोन करायचे आहेत. असे म्हणून विनोद फोन करू लागला. आधी त्याने केरळ मध्ये फोन केला.

इंद्रधनुष्य - ई-अंक

लेखक दशानन यांनी सोमवार, 05/07/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य नावाचे ई-मासिक चालू करत आहे. ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे. प्रथम अंक असल्यामुळे व अश्या प्रकारचा अंक काढण्याचा अनुभव मागे नसताना देखील आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्याचा उद्देश मी मराठी वरील लेखन त्या ९५% लोकांच्यापर्यंत देखील पोहचावे ज्यांना ऑर्कुट, फेसबुक अथवा चॅट पलिकडली विश्व माहीतच नाही आहे. आपण मी मराठीवर प्रकाशित केलेले लेख तसे ही लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव न देता मेल फॉरवर्ड मधून फिरत असतातच.

देवा ढळो नेदी | माझी चित्त वृत्ती |

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
देवा ढळो नेदी | माझी चित्त वृत्ती | सदा पाहो दिठी | रूप तुझे || कष्टी हा संसार | व्यथाही अपार | तरावया पार | हात दे गा || कर्तव्य स्मरून | राखावे ते धन | परी अंत: करण| तुज पाशी || कटू बोल घेता | स्थिर ठेवी चित्ता | तव नाम घेता | शांत करी || देवा तुझे चरणी | आलो सर्व हरोनी | मज दया करोनी | सांभाळावे || - सागर लहरी २५.६.२०१०

भारत बंद , न्युज चॅनल्स आणि ह.ह.पु.वा.

लेखक टारझन यांनी सोमवार, 05/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , हो , आहो भारत बंद आहे ना आज ? मंग ? आम्ही घरी पडिक :) (तसंही ऑफिसात असलो तरीही आम्ही पडीकंच असतो) एखाद्या पक्षाला एकदा का बहुमत मिळालं आणि त्याला काँपिटिशन मिळाली नाही , की तो कशी मनमानी करतोय, हे आपण प्रत्यक्ष बघतोय , नाही ? असो.. राजकिय मुद्द्यांवर वाद घालावा असा काही माझा इथे हेतु नाही. पण या सगळ्यात फायदा आहे तो ण्युज चॅणल वाल्यांचा हो !! पहा पहा , आपले ण्युज वाले आपल्याला घरबसल्या अपडेट्स मिळावे म्हणुन कसे ह्या सुटीच्या दिवशी बंदाचे अपडेट्स घेऊन येत आहेत :) एक बाकी सत्य , एखादा ण्युज चॅणल असो वा वृत्तपत्र, राजकियस बायस्ड पणा त्यांत असतोच.

एक जुना मित्र भेटला ..

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज एक जुना मित्र भेटला .. गर्क स्वत:शी... पहात हसत राहिला जुने जुने.. सुने काही.. धुळी मधे गिरवत राहीला .. बरेच बोललो बसून दोघे .. बोललो दोघे स्वत:शी ... वाट पुढे धावणारी पुन्हा जुन्या वळणाशी .. हळवे शांत डोळे त्याचे .. वेडेपणाची झाक जराशी ... धुळी मधले नाव पाहून... मीही हसलो स्वत:शी... मीही हसलो स्वत:शी...

गे कविते

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये , मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १ बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २ कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या, वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३ -- सागर लहरी २२.२.२०१०

बसरा ते बावला

लेखक रामदास यांनी सोमवार, 05/07/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीनंतर हिर्‍याचे महत्व वाढत गेले. त्या आधी हिर्‍याचे मोल कमी होते असे नाही पण दागीन्यामध्ये मोत्यांचा वापर खास करून बसर्‍याचा वापर होत असे. मोती म्हणजे बसरा.चोखा मोती .त्यात जीवन आणि पातळ जीवन असे दोन प्रकार . त्यानंतर बदला मोती .थोडेसे खडबडीत कमी गोल असे. काळे मोती कागाबाशी तर बाकी सगळे गावशाही . कधी कधी लांबोळक्या नूर मोत्याचा वापरही केला जायचा. फिकट रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मोत्यांना पण वेगळीशी नावे होती. हुर्मुजी म्हणजे गुलाबी.लालसर म्हणजे गुळधानी .थोडी फिकट पांढरी छटा पण काळी नव्हे असे शुक्री मोती .