Skip to main content

मनोरंजक आकडेवारी फुटबॉल विश्वचषक (केवळ गंमत)

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 06/07/2010 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
वेगवेगळ्या मित्रांकडून फिरत फिरत आलेली एक मेल मराठीत टंकीत करून आपल्या वाचकांसाठी देत आहे. केवळ गंमत म्हणून या कडे पहावे. (हा वर्ल्ड कप कुणाला द्यायचा आहे हे अगोदरच ठरले आहे का?) =========================== विश्वचषकाचे मानकरी त्यांचे वर्ष आणि काही बेरजा १) ब्राझील १९९४ आणि १९७० (१९७०+१९९४)=३९६४ २) अर्जेंटीना १९८६ आणि १९७८ ( १९७८+१९८६)=३९६४ ३) जर्मनी १९९० आणि १९७४ (१९९०+१९७४) =३९६४ ४) ब्राझील २००२ आणि १९६२ (२००२+१९६२)=३९६४ वरील आकडेवारी बघता, एक सोपी गोष्ट करा. ३९६४ मधून २०१० वजा करा. उत्तर येईल,१९५४! १९५४ मध्ये कुणी कप घेतला होता? जर्मनी ??????

गाणे : असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/07/2010 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी मराठी वरच्या "गाण्याच्या-यशामधले-संगीत-संयोजकाचे-योगदान" या धाग्यावरून मला खालील गाणे करता आले. ( हे गीत येथे देतांना त्याची लिंक संकेतस्थळ अ‍ॅक्सेस होत नसल्याने देवू शकत नाही.
काव्यरस

बंद!

लेखक तिमा यांनी सोमवार, 05/07/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
बंद जाहीर झाला होता. पण नेहेमीसारखा तुमच्या आमच्या आयुष्यातला नव्हे. तर राडेसेनेच्या एका पदाधिकाराच्या घरांत जाहीर झाला होता. आपण त्याला शाप्र म्हणुया. बायकोने, मुलांनी एकमुखाने मिळून हा बंद जाहीर केला होता. कारण होते, त्याची वागणुक! म्हणजे घरातली आणि थोडीफार बाहेरची. ऐकल्यावर पहिल्यांदा तर त्याने सातमजली हंसून घेतले. पण मुले व बायको अजिबात हसत नाहीयेत हे लक्षांत येताच तो गुर्मीने ओरडला,' अरे जारे, काय करता बघतोच मी पण! शाप्र मोठ्या मेहनतीने या स्थानावर पोचला होता. अनेक लोकांचे पत्ते काटून त्याने 'वरची' मर्जी संपादन केली होती.

एकदा होवोनी पक्षी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/07/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा होवोनी पक्षी
वाटे एकदा होवोनी पक्षी पहावी शेते डोंगर नद्यांची नक्षी उंचच उंच जावे वरती वरती अलगद उतरावे धरणीवरती हळूच आपले पंख पसरूनी घास शोधावा हिरव्या रानी शोधावा पाणवठा निर्मळ शितल प्यावे पाणी थंडगार नितळ मध्येच एखाद्या झाडावर थांबावे विश्रांती घ्यावी पंख झाडावे चोचीने फळ एखादे तोडावे मनात येईल तेव्हा उडावे दिवसभर असेच फिरावे सायंकाळी पुन्हा माघारी यावे घरचे सारे पुन्हा भेटावे काय घडले दिवसभरात ते सांगावे - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०७/२०१०
काव्यरस

दाभिळ टोक ते अर्थर-सीट... एक थ्रीलींग अनुभव

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 05/07/2010 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत... "मास्तर, ३ घिसर द्या..." "पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..." "कुठ पर्यंत जाते मग?" "विहिर... त्यापुढं नाही जात..." काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार... "सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..." तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले...

वादळ वळवाचे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/07/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ वळवाचे - - - - - वादळ वळवाचे ना धड पोसते ना धड नासते . नि झाड झोडलेले ना धड वाकले ना धड मोडले - - - - -

ही ही तिची गाथा

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 05/07/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
नंदन यांची अप्रतिम गाथा वाचल्यावर त्यावर केशवसुमारांचे विडंबन येण्याची वाट पाहिली. ते न दिसल्यामुळे स्वतःच एक प्रयत्न करायचे ठरवले. ही महिला दहा बारा वर्षांनी मोठी आहे. तिची लेकरे आता कॉलेजात जातात, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि तिचे स्टेटसही उंचावले आहे. वि़डंबन म्हणजे विनोद म्हणजेच विसंगती अधिक अतीशयोक्ती हे होणारच. त्यातून माझा पहिलाच प्रयत्न. तेंव्हा ह.घ्या.
काव्यरस