बंद जाहीर झाला होता. पण नेहेमीसारखा तुमच्या आमच्या आयुष्यातला नव्हे. तर राडेसेनेच्या एका पदाधिकाराच्या घरांत जाहीर झाला होता. आपण त्याला शाप्र म्हणुया. बायकोने, मुलांनी एकमुखाने मिळून हा बंद जाहीर केला होता. कारण होते, त्याची वागणुक! म्हणजे घरातली आणि थोडीफार बाहेरची. ऐकल्यावर पहिल्यांदा तर त्याने सातमजली हंसून घेतले. पण मुले व बायको अजिबात हसत नाहीयेत हे लक्षांत येताच तो गुर्मीने ओरडला,' अरे जारे, काय करता बघतोच मी पण!
शाप्र मोठ्या मेहनतीने या स्थानावर पोचला होता. अनेक लोकांचे पत्ते काटून त्याने 'वरची' मर्जी संपादन केली होती.