गणित
"खुप दिवसाने भेटतोयस रे".
खराय.
" तुला एक प्रश्न विचारायचाय"
विचार.
"तु स्वतः ला काय समजतोस"?
माणुस
"आर्थिक चौकटी बद्दल बोलतोय"
अस का? अं.... मध्यम मध्यम वर्गिय.
"जरा सविस्तर सांग बघु."
खाउन पिउन सुखी. पण बँक बॅलन्स, ओल्ड एज इन्वेस्ट्मेंट्स वगिरा वगिरा काही नाही. घरात खर्च होते त्याच्या जवळपास उत्पन्न. वर्षाअखेरीस बॅलन्स शीट जमते. कधी थोडीफार शिल्लक. कधी नाही. सापशिडीचा खेळ.
"म्हणजे माझ्यासारखेच"
बर मग?
" ही पोझीशन तुला तुझ्या गुणवत्तेला बुद्धीमत्तेला अनुसरुन आहे का"?
आता हे काय नविन?
"नाही रे. तु मला कायम म्हणतोस. माझ्या बुद्धीमत्तेचा निट वापर केला असता तर मी खुप कमाउ शकलो असतो.
मिसळपाव