गणित
"खुप दिवसाने भेटतोयस रे".
खराय.
" तुला एक प्रश्न विचारायचाय"
विचार.
"तु स्वतः ला काय समजतोस"?
माणुस
"आर्थिक चौकटी बद्दल बोलतोय"
अस का? अं.... मध्यम मध्यम वर्गिय.
"जरा सविस्तर सांग बघु."
खाउन पिउन सुखी. पण बँक बॅलन्स, ओल्ड एज इन्वेस्ट्मेंट्स वगिरा वगिरा काही नाही. घरात खर्च होते त्याच्या जवळपास उत्पन्न. वर्षाअखेरीस बॅलन्स शीट जमते. कधी थोडीफार शिल्लक. कधी नाही. सापशिडीचा खेळ.
"म्हणजे माझ्यासारखेच"
बर मग?
" ही पोझीशन तुला तुझ्या गुणवत्तेला बुद्धीमत्तेला अनुसरुन आहे का"?
आता हे काय नविन?
"नाही रे. तु मला कायम म्हणतोस. माझ्या बुद्धीमत्तेचा निट वापर केला असता तर मी खुप कमाउ शकलो असतो. पण गेली २५ वर्षे मी ते कधीच करु शकलो नाही".
बर मग?
"आज अचानक ह्या वयात एक कलाटणी मिळाली. सर्व चित्रच पालटले.
उत्पन्न तिप्प्ट झाले. मुलीच्या लग्नाची व्यवस्था झाली. म्हातारपणाची काळजी मिटली".
बर मग?
"आज मी अचानक सगळ्याच्या गळ्यातल्या ताईत बनलो. बायको, मुलगी ह्यांच्या नातेसंबधात अगदी लक्षणीय फरक पडला. कधी फारशी न बोलणारी मुलगी आता माझी वाट बघते जेवायला. बायको डबा करुन देते. अचानक लग्नानंतरची दोन वर्षे पुन्हा जगतोय"
चांगले आहे की. ह्यात प्रॉब्लेम काय आहे तुला?
" मी तोच. काही ही बदल नाही. मग प्रश्न असा की घरामधला माझा पुरुष म्हणुन मान हा माझ्या उत्पन्नाशी संबधीत आहे का?Is My position in my family directly proportional to my income"?
गणित कसली सोडवतोयस. मिळतेय ते घे आणि गप्प बस की. मला ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही.
वाचने
5683
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
अर्थस्य पुरुषो दासः
In reply to अर्थस्य पुरुषो दासः by प्रकाश घाटपांडे
अवघड गणित
:-)
हम्म्........खर आहे ते...
मास्तर डू
In reply to मास्तर डू by विंजिनेर
इझी
कदाचित
In reply to कदाचित by राजेश घासकडवी
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
कादंबर्या
In reply to कादंबर्या by मिसळभोक्ता
कोणत्या कादंबर्या?
प्रश्नाच
मग प्रश्न
माझ्या
घासकडवींच
पैसा हे सर्वस्व नाही
In reply to पैसा हे सर्वस्व नाही by चतुरंग
चतुरंगांच
In reply to पैसा हे सर्वस्व नाही by चतुरंग
सहमत!
असं काही
अचानक पालट
कादंबरीमधला हिशोब
मास्तर गणित अवघड आहे.
मिळतेय ते