Skip to main content

संमोहन------ संदर्भः माइंडफ्रीक-क्रिस एंजल

लेखक भाऊ पाटील यांनी मंगळवार, 13/07/2010 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्ही चाळतांना AXN वर 'माइंडफ्रीक-क्रिस एंजल' असा कार्यक्रम शेवटची ५ मिनिटे बघायला मिळाला. त्यात क्रिस एंजल एका रेस्तरॉ मधे जेवत असलेल्या लोकांना फक्त ४-५ वाक्ये बोलून संमोहित करतो आणि झोपण्यास सांगतो. अचंबित होण्याचि गोष्ट म्हणजे ४०-५० लोक त्याच्या एका चुटकीसरशी झोपी जातात. अगदी हातात ट्रे घेवुन चालणारा वेटर देखील चुटकी वाजताच झोपतो आणि धाड्कन जमिनीवर कोसळतो. अशी २ मिनिटे गेल्यावर क्रिस एंजल त्यांना जागे व्हा असा आदेश देतो आणि सारेजण जागे व आश्चर्यचकीत होतात. (ह्याचे विडिओ तुनळीवर आहेत) संमोहन ह्या प्रकाराबद्दल मिपावर कोणी माहितगार आहेत का? हे सर्व खरे आहे की बनावट?

आज जगन्नाथाची रथयात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 13/07/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नंदीघसा तोरा अटकी गला बडसंखठारे किए से भकत एते आपणर डाकिला चंदनपुरे... काळीया रे काळीया रे काळीया रे...
अरे काळ्या, तुझा नंदीघोष (रथ) बड शंखाच्या ठिकाणी अडकून थांबला...असा कोण तुझा भक्त आहे की त्यानं चंदनपुरातून तुला हाक मारली आणि तू तुझा रथ थांबवलास? ओरीसाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक जीवनातील महत्त्वपूर्ण अशी जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होतेय. पुरीतील रथयात्रेचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहू शकता. जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम! (इथे अधिक माहिती यापूर्वी दिली होती.)

नातीगोती व वंशावळी जपण्याचा नवा ई-मार्ग....

लेखक स्वछंदी-पाखरु यांनी मंगळवार, 13/07/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या व अंतरजालाच्या जीवन पद्धती मध्ये नातीगोती जपणे खरोखरच अवघड झाले आहे, म्हणूनच कि काय आता हे जपण्यासाठी अंतरजालामध्येच हि सुविधा उपलब्ध झालि आहे. www.geni.com हे संकेतस्थळ कसे काम करते?? Geni हे संकेतस्थळ आपण आपली वंशावळी बनवण्यासाठी वापरता येईल,आपल्या नातेवाइकांमधे नवीन कार्यक्रम किंवा छायाचित्रे प्रकाशित करता येतील, ह्या संकेतस्थळाचा उपयोग आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या वंशाच्या नवीन किंवा असलेल्या शाखांचा आराखडा बनवता येतो. ह्या संकेतस्थलाव

माझे किडे

लेखक jaypal यांनी मंगळवार, 13/07/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या रविवारी(११/७/२०१०) येउर जंगल भटकंती दरम्यान...... hjkh gdfg FSD CZX

भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत.. हिंदू धर्मातील अडगळ..

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 13/07/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुद्वेष्टे नेमाडे यांचा जावईशोध ! मुंबई, ११ जुलै (वार्ता.) - मलिक अंबर हा ‘महाराष्ट्र धर्म’ स्थापन करणारा पहिला माणूस. आपण रामदासांचे नाव घेतो; पण ते काही खरे नाही. मलिक अंबरनेच शहाजी इत्यादींसारख्या मराठ्यांना सर्वप्रथम एकत्र केले आणि त्यातून मराठा धर्म पुढे आला. आज आपण हिंदु संस्कृती जगत असलो, तरी बौद्ध धर्मही पाळत आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाची सारी तत्त्वे बौद्ध धर्मातूनच घेतलेली आहेत, असे अकलेचे तारे हिंदुद्वेष्टे लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी तोडले. नेमाडे यांचे ‘हिंदु : जगण्याची एक समृद्ध अडगळ’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

आग्रहाचे निमंत्रण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/07/2010 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी. एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग..

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.

मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 13/07/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न. अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं.