Skip to main content

आयरलिक्युअर कुखन- एगलिक्युअर केक

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 13/07/2010 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मार्लिसकाकू हानोफरच्या, त्यांच्याकडे कॉफीला गेलो असताना त्यांनी हा फर्मास केक केला होता.

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा राहीला सीमाभागी वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ|| दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे विचार नको करू, नको मनामधे झुरू समजू नको अभागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१|| आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू जरी लाठ्या डोक्यास लागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२|| जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल झालो मोठे त्य
काव्यरस

मनोहारीदांचे दु:खद निधन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 13/07/2010 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात सॅक्सोफोन-वादक व निपूण संगीत संयोजक मनोहारी सिंग यांचे आज मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. आज खर्‍या अर्थाने हिंदी चित्रपट संगीतातला ब्रास पोरका झाला; सॅक्सोफोन, की- फ्लूट, बासरी अशी सर्व प्रकारची फूंक्-वाद्ये लीलया वाजविणारे मनोहारीदा आज पडद्याआड गेले आहेत. गेले काही वर्षे ते किडनीच्या विकाराने आजारी होते तरीही त्यांचा उत्साह आणि दमसास तरूणाला लाजविणारा होता.

"पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे...

लेखक श्रीराजे यांनी मंगळवार, 13/07/2010 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, सध्या कंपनी मध्ये Go Green Go Green चे वातावरण आहे. त्यासाठी कंपनी एक गट तयार केला आहे. आणि आता सर्वांना t-Shirt वर "पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे. यासाठी मिपाकर मला मदत नक्कीच करतील. - वाक्य शक्यतो मराठीतच पाहिजे आहे. --श्रीराजे

रव्याचे खमंग थालीपीठ

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 13/07/2010 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज कुठली ही प्रस्तावना न देता लगेच कामाला सुरवात करू.. घ्या साहित्य लिहून साहित्य: सर्व साहित्य एका थालीपिठाला पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे.. १. ५ वाटी रवा १/२ लहान कांदा बारीक चिरून १/४ वाटी खोवलेले ओले खोबरे १/२ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून १ वाटी आंबट दही / ताक सुद्धा चालेल २ टेबल चमचा साजूक तूप १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार जिरे पूड, धणे पूड, मीठ (ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स.

तारकर्ली - कोकण

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/07/2010 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
तारकर्लीचा स्वच्छ पांढर्‍या रेतीचा समुद्रकिनारा तारकर्लीचे एमटीडीसी रेसोर्ट

डॉ. सुब्रमनिअन स्वामी

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 13/07/2010 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका मित्राने यु-ट्युब च्या या लिंक पाठवल्यत.... कोण म्हणत भारतात काँन्स्पिरसी थेरी नाही म्हणून?

समुद्रभाजी - डायला

लेखक जागु यांनी मंगळवार, 13/07/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही भाजी समुद्राच्या कडेला मिळते. काही क्वचीत कोळणी घेउन येतात ही भाजी. ही भाजी दिसायला ऑफीसटाईम्/घोळीच्या भाजीसारखी दिसते. हिची चव खारट असते. नुसते पान खाल्ले तरी खारट लाग्ते. ह्याची पाने काढून ती डाळीमध्ये, कोलंबीमध्ये, ओल्या, सुक्या जवळ्यात घालतात. ज्या विकायला बसतात त्या सांगतात की ही भाजी औषधी असते. रोगांवर चांगली असते. पण नेमकी काय गुणधर्म किंवा कोणत्या आजारावर गुणकारी आहे हे त्यांना सांगता येत नाही.