Skip to main content

मी मिसळपाव ची सभासद होते त्याची गोष्ट

लेखक प्रभा यांनी शुक्रवार, 22/10/2010 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी प्रभा. मिसळपाव ची नवी सभासद. माझे मेहुणे श्री सुधीर काळे यांच्या प्रयत्‍नांमुळे व मी नक्कीच लिहू शकेन या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे मी "मिपा" ची सभासद झाले. श्री काळे यांचे "मिपा" वर खूपच लिखाण आहे. ते मध्यंतरी ठाण्यात आले असताना त्यांनी माझ्या "मिपा" च्या सभासदत्वासाठी प्रयत्‍न केले. पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत, अगदी लहान लहान गोष्टीतही सारखी माशी शिंकत असते. आता ही माशी कशी शिंकते हे मला माहित नाही. तिचा शिंकण्याचा आवाज कसा असतो? तिचे नाक कोठे असते? हे कोणालाच माहित नाही. मुळात माशीला सारखी सर्दी होतेच कशी?

कोजागिरी पौर्णिमा २०१०

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शुक्रवार, 22/10/2010 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज शुक्रवार, आम्हा चाकरमान्यांची हक्काची सुट्टी, इकडची एमआयडिसी शु़क्रवारी बन्द असते. त्यात आज सुट्तीच्या दिवशी कोजागिरी म्हणजे दुधात साखरच / गार्लिक ब्रेड विथ चिझ ;) मी ठरवले होते कि आज काहितरी छान पदार्थ करायचा. त्यात काल निवेदिता-टाईची काजुकतरीची पा़क्रु पाहिलि व ठरवलेच की करुन पहायचीच, सोपी पण वाटली. एक मैत्रीण कायमची दुबई सोडुन गेली तेव्हा घरातले काजु तिने मला दिले हे लक्शात होतेच.

तारूण्य

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 22/10/2010 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्‍याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो.

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 22/10/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्य ठाकरे एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे. रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.

अतिरेक्यांचे मित्र

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 22/10/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुणधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता– काश्मीरला आझादी – एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती.

मराठी असे अमुची मायबोली | जरी तिची आम्हास पर्वा नसे ||

लेखक पारा यांनी शुक्रवार, 22/10/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
अस मला आजकाल म्हणावसं वाटत आहे. आता तुम्ही विचारलं की का बुआ, असं विशेष काय झालं. नाही म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून वाटायला काहीतरी घडावाच लागतं असं आहे का ? असो. तसं आहे खरं. आता बघा, मी राहतो पुण्यात. कामानिमित्त. तसा मी मुळचा मुंबईचा, पण पुणं तसं मला नवीन कधीच नव्हतं. बरेच नातेवाईक राहतात माझे इथे. लहानपणापासून येतोय मी इथे. आवडतं ही मला पुणं. विद्येच माहेरघर म्हणतात ह्याला. एकेकाळी इकडच्या सर्व शाळांना आपापला माज होता. एक गर्व, आता तो दुराभिमान कि अभिमान ह्या वादात मी आत्ता जात नाही. पण हा गर्व आज मला कुठे दिसत नाही.

भारतवेडी कमला

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 22/10/2010 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
भारतवेडी कमला
आपण ऐकत आलोय स्वामी विवेकानंदांच्या आभावलयामुळे प्रभावित झालेल्या भगिनी निवेदिता किंवा महात्मा गांधींच्या सात्विक व तत्वनिष्ठेने प्रभावित झालेल्या मीराबेनची आत्मसमर्पणाची भावना. देश बंधु-बांधवांना सोडून भारताची आस धरुन आलेल्या त्यागी महिला.

साद सागराची

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 22/10/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली!!! काय करावे????? चला तर आज तुम्हाला पुण्या-मुंबईपासुन जवळच असलेल्या समुद्रकिनार्‍याची भटकंती करून आणतो. :) कसला विचार करताय???? चला सुरुवात मुंबईपासुन करूया आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत जाऊन येऊया.