Skip to main content

मुहब्बत में ताज छुटे...

लेखक सुनील यांनी शनिवार, 30/10/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
देवानंदच्या "तेरे घर के सामने" ह्या चित्रपटात एक सुरेख गाणे आहे - मुहब्बत में ताज बनें, ये भी तुम्हे याद होगा मुहब्बत में ताज छुटे, ये भी तुम्हे याद होगा अशा मुहब्बतीत बनलेल्या ताजबद्दल पुष्कळ काही लिहिले गेले आहे पण मुहब्बतीत सुटलेल्या, सोडाव्या लागलेल्या राजमुकुटाविषयी फारसे लिहिले गेलेले नाही. मिपाकर रामदासांनी त्यांच्या प्रिन्सीच्या कथेत वॉलिस सिंप्सन ह्यांचा ओझरता उल्लेख केला आहे... वॉलिस सिंप्सन ही अमेरिकन सौंदर्यवती.

स्वातंत्र्योत्तर भारत

लेखक प्रमोद सावंत१ यांनी शनिवार, 30/10/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली.

मुखपृष्ठाकरता शब्दांकन हवे आहे, चित्रसंकलन करून हवे आहे..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 30/10/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, योगेश यांनी मिपावर लिहिलेल्या सिंहगडावरची खादाडी या लेखावर आधारीत छानसे मुखपृष्ठ बनवायचे आहे.. आपल्याकडे अनेक संगणक करामती तज्ञ आहेत, त्याच प्रमाणे शब्दप्रभूही आहेत. मिपावरील कुणी संगणक करामती तज्ञ संकलक मला सदर लेखातील सार्‍या चित्रांचे छानसे एकत्रित संकलन करून देईल का? संकलन करून त्याची एकच जेपीजी बनवून द्यावी.. उदाहरणादाखल मी एक संकलन केले आहे.

वेलकम टु द लाईफ..बार !! (प्राईस ऑफ सॅक्रिफाईस.)

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 30/10/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कांऊटर वरच्या पोरांशी हाय-हॅलो झाल्यावर, माझ तिथल्या आडोश्याकडे लक्ष गेल, तिथ हे चित्र होतं. खरे तर या आडोश्याला मी बरीचशी चित्र पाहिली होती,पण एखाद्या लहान मुलाला ? श्या !!

बॉडी डबल

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 30/10/2010 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.

मासे १५) बला

लेखक जागु यांनी शनिवार, 30/10/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
बला म्हणजे वाकटीचाच मोठा प्रकार. म्हणजे सिनियर वाकटी म्हणा हव तर. हा बला २ फुटा पेक्षा मोठाही असतो. बल्याचे कालवण चांगले लागत नाही. तो तळूनच चांगला लागतो. साहित्य : बला (१ बला भरपुर होतो) हिंग हळद मिठ मसाला लसुण पाकळ्या ठेचुन तेल कृती : प्रथम बल्याचा किनारीचा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे. धुतलेल्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद चोळून घ्यायचे. तव्यावर तेल सोडून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या सोडून तुकड्या तळण्यासाठी टाकायच्या.

नारायणरावांची पुण्याई!, नितिन देसाईला शुभेच्छा..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 30/10/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आमचं दैवत असलेले, मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई हे चित्रपट निर्मिती करत आहेत. ही अत्यंत मोलाची कामगिरी ते करत आहेत, त्याकरता त्यांचं अभिनंदन व चित्रपटाकरता अनेकानेक शुभेच्छा.. आज हिंदी रजतपटाच्या दुनियेत नितिन देसाईंनी कला-दिग्दर्शक म्हणून आपल्या उत्कृष्ट कामाचा जो ठसा उमटवला आहे त्याचा कुठल्याही मराठी माणसाला अभिमानच वाटावा..

मोरावळा-----

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 30/10/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- दहा-पंधरा चांगले मोठे आवळे, एक किलो साखर, पाकासाठी थोडेसे पाणी. कॄती :- आवळे स्वच्छ धुवुन घ्या, एका पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळण ठेवा, त्यात आवळे घाला, दहा मिनिटे वाफ़वून घ्या. जरा गार झाल्यावर त्यातील बिया काढून टाका, व त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करा. आता त्या मोजा किती वाट्या आहेत फ़ोडी, त्याच्या दुप्पट साखर घेउन त्यात थोडेसे पाणी घालून पाक करण्य़ास ठेवा, चांगले बुडबुडे येइपर्यंत पाक होवु द्यात,

"आदर्श" सोसायटी.

लेखक मितभाषी यांनी शनिवार, 30/10/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
लष्करी अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासूबाईंचा फ्लॅट असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हा महिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे समजते. भगवती मनोहरलाल शर्मा या चव्हाण यांच्या सासूबाई आहेत. तसेच यातील १०३ क्रमांकाचा फ्लॅट एस. बी. चव्हाण या नावाने असून मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव शंकरराव भाऊराव चव्हाण असल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचं दिसून येत असल्याची चर्चा आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या पत्नींना घरे देण्यासाठी हा भूखंड लष्करी अधिकाऱ्यांनी मिळवला.