मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मासे १५) बला

जागु · · पाककृती
बला म्हणजे वाकटीचाच मोठा प्रकार. म्हणजे सिनियर वाकटी म्हणा हव तर. हा बला २ फुटा पेक्षा मोठाही असतो. बल्याचे कालवण चांगले लागत नाही. तो तळूनच चांगला लागतो. Image removed. साहित्य : बला (१ बला भरपुर होतो) हिंग हळद मिठ मसाला लसुण पाकळ्या ठेचुन तेल कृती : प्रथम बल्याचा किनारीचा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे. धुतलेल्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद चोळून घ्यायचे. तव्यावर तेल सोडून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या सोडून तुकड्या तळण्यासाठी टाकायच्या. Image removed. मिडीयम गॅसवर ठेवुन ५ मिनीटांनी पलटी करुन पलटी बाजू शिजल्यावर गॅस बंद करायचा. नेहमीचच हो हाय काय नी नाय काय ? झाल्या तळलेल्या तुकड्या तयार. काय पाहुनच भुक लागली की नाही ? Image removed. अधिक टिपा : लसूण मसाल्यासोबतच मिक्स केला तरी चालतो. किंवा आललसुण पेस्ट लावली तुकड्यांना तरी चालते. पिठ किंवा रवाही लावु शकता तुकड्या तळताना.

वाचन 14343 प्रतिक्रिया 0