Skip to main content

रैना बिती जाए..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 31/10/2010 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..! सुरवातीलाच सारंगी.

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण

लेखक शुचि यांनी रविवार, 31/10/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्‍या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या. रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले.

" मनांतले श्लोक - "

लेखक विदेश यांनी रविवार, 31/10/2010 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे रूप साधे किती गोजिरे रे तुला लोचनी साठवू साजिरे रे असावा जसा वाटतो तू तसा रे धनी - निर्धनी दर्शना येती सारे ।१। जिथे जाउ साई तिथे ती असावी सुखी सावली सोबतीला असावी कुठेही कधीही कशीही दिसावी तुझी मूर्ति साधीच नयनी ठसावी ।२। न गर्वात , सर्वात मिसळून राही न जाती , न धर्मात गुंतून राही गरीबात रावात देवास पाही असा देव साईविना कोणि नाही ।३। धना - कांचनाचा भुकेला न साई न लोभास मोहास स्वाधीन होई जयांना कळेना कसा देव साई तयांना कळू दे असा देव साई ।४। ’ सबूरी नि श्रध्दा ’ - शिकवण न स्मरणी मनीं अंधश्रध्दा - फळाची दिवाणी जमेना कुणाला फकीरी रहाणी रुचेना कुणाला सदाचार वाणी ।५। चढाओढ परदेशवारीत कोण
काव्यरस

बाणाची कादंबरी

लेखक अवलिया यांनी रविवार, 31/10/2010 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्रक राजाचा दरबार भरलेला असतो. अनेक दरबाराची कामे चालु असतांनाच एक चांडाळाची मुलगी दरबारात पोपट घेऊन येते. हा पोपट साधासुधा नसतो तर चक्क मानवी वाणीने बोलणारा पोपट असतो. ती चांडालकन्या पोपट राजाला भेट म्हणुन देते. शुद्रकाला पोपटाविषयी खुप कुतुहल वाटुन तो त्याला त्याची हकिगत विचारतो. तेव्हा तो पोपट त्याची दु:खद कहाणी सांगतो. विंध्यारण्यातील एका मोठ्या वृक्षावर तो आणि त्याचे वडील रहात असतात. त्याच झाडावर त्याचे अनेक सगेसोयरे रहात असतात. पोपटाची आई लहानपणीच वारल्याने त्याच्या वडीलांनीच त्याचा संभाळ केलेला असतो.

कथा: चंद्या सख्याची सहल

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/10/2010 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
कथा: चंद्या सख्याची सहल
चंद्या आन सखाराम दोघं जिगरी दोस्त हुते. शाळंत जायचं बरूबर. इटीदांडू खेळायचं बरूबर. त्याल, साकर, बा ची तमाखू, इडी आनाया गावात बरूबर जात. सकाळची शाळा सुटली म्हंजे संगच दोघांच्या बकर्‍या बरूबर चरायला रानात न्येत आसत. चंद्याच्या ५ आन सख्याच्या ८ बकर्‍या व्हत्या. रानात जातांनाबी त्ये मजा करत जात. कुनाच्या बांधावरच्या बोरी झोडपाया थांबत तर कधी कुनाच्या उसात शिरून मनगटाएवढा जाड उस तोडून खायाला सुरुवात करत. शेळ्या घेवून तसं त्ये मदुनच माळावरनं जात. तिथं थोड्या येड्या बाभळी व्हत्या.

अवचित....

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 30/10/2010 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, कोणतेही प्रश्न तेव्हा आठवत नाहीत, सुख-दु:ख सार्‍याचा विसर पडतो. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते. अजूनही गर्द रानाने वेढलेला अवचितगड कोकणात रोह्याच्या जवळ आहे. पुण्याहून रोह्याला जायला ४ तास लागतात. तिथून पुढे पिंगळसई किंवा मेढा या गावी यावे. या दोनही गावातून पायवाट गडावर जाते. कोकण रेल्वे या गडाला अगदी बिलगून जाते. आम्ही पिंगळसईला साधारणपणे ११ वाजता पोचलो.

विनोबा....

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 30/10/2010 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी एका सर्वोदय मासिकासाठी काही रेखाचित्रे काढली होती. (ती प्रकाशित झाली नाहीत हा भाग वेगळा) पण राघव म्हणाला तसे cross hatching technique इथे वापरले होते. याने थोडा 3D effect आणता येतो. माझा हा कदाचित पहीला अणि शेवटचाच प्रयत्न असावा. परत चालू करावा वाटतो पण इच्छाशक्ती कमी पडते.