मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" मनांतले श्लोक - "

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुझे रूप साधे किती गोजिरे रे तुला लोचनी साठवू साजिरे रे असावा जसा वाटतो तू तसा रे धनी - निर्धनी दर्शना येती सारे ।१। जिथे जाउ साई तिथे ती असावी सुखी सावली सोबतीला असावी कुठेही कधीही कशीही दिसावी तुझी मूर्ति साधीच नयनी ठसावी ।२। न गर्वात , सर्वात मिसळून राही न जाती , न धर्मात गुंतून राही गरीबात रावात देवास पाही असा देव साईविना कोणि नाही ।३। धना - कांचनाचा भुकेला न साई न लोभास मोहास स्वाधीन होई जयांना कळेना कसा देव साई तयांना कळू दे असा देव साई ।४। ’ सबूरी नि श्रध्दा ’ - शिकवण न स्मरणी मनीं अंधश्रध्दा - फळाची दिवाणी जमेना कुणाला फकीरी रहाणी रुचेना कुणाला सदाचार वाणी ।५। चढाओढ परदेशवारीत कोणा न चिंता तयांना जरी हो ठणाणा मनीं आगळा वेगळा ध्यास कोणा कमी ना पडू देति रजता - सुवर्णा ।‍६। उणे ना कुणाचे दुणे काढले ते मनांतिल विचारा पुढे मांडले ते स्मरणांत शिकवण तुझी ठेविना ते करंटेच सारे तुला जाणिना ते ।७।

वाचने 1078 वाचनखूण प्रतिक्रिया 0