Skip to main content

नाग !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! मी बघितलाय ह्या त
काव्यरस

आई !!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
किती काळ गेला तुला जाऊन तुझी आठवण येत नाही असे होत नाही. पण तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!
काव्यरस

शोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला

लेखक अर्धवट यांनी मंगळवार, 16/11/2010 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
*हे प्रवासवर्णन नाही, माझ्या आवडत्या शहराविषयीचा कृतज्ञतालेखच म्हणा हवे तर*
एका मुठीत लॅटपॉटची बॅग, दुसर्‍या मुठीत जीव आणि पोटाने सामानाची ट्रॉली ढकलत नेताजी सुभाषचंद्र विमानतळाच्या बाहेर आलो तेव्हा समोर गच्च गर्दीमधून भरधाव वेगाने पिवळ्या टॅक्सी जात होत्या, आणि एक टॅक्सी ड्रायवर तिथे माणसांना एका हाताने थोपवून गाड्यांना पुढे सोडत होता. मी ह्याचा अर्थ लावत असतानाच त्याचे शब्द कानावर पडले "जोल्दी जोल्दी जोल्दी... जोल्दी चोलो.. दो चार मर गया तो भी प्रोब्लेम नोई.. जोल्दी चोलो" माझं भारतातलं दुसरं सर्वात आवडतं शहर म्हणजे कोलकोता.

हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू पंखावर मस्त रंगीत ठिपका गिरकी घेत झुलत असते फुलांच्या गंध भारल्या स्वप्नात फुले खुणावतात फुलपाखराना खुळावतात त्याला आपल्या मत्त गंधाने फुलपाखरू धुंद ! मंत्रमुग्ध !! खेचले जातात आपोआप नकळत स्पर्श करते फुलांना फुलपाखरू एक शहारा फुलाच्या रोमारोमात अग आईग केवढा काटा फुलला माझ्या गर्भ कोशात सरसरून !! पाकळी पाकळी मत्त असते रेशीम रेशीम मस्त मुलायम पाकळीच्या स्पर्श सुखाने फुलपाखरू जाते मत्त होऊन आस कळीला जन्म घालण्यास फुले जातात वेडात हरवून नि ध्यान लागते फुलपाखराला दोघेही जातात स्वप्नात हरवून ...!!!!
काव्यरस

विसर- भुकेचा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 16/11/2010 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
सौन्दर्या पुढे कधी कधी भूकेचा सुद्धा विसर पडू शकतो हे दाखवणारी काव्य-कथा. नानाविध रंगांनी भरला पुष्पसुगंधे साज बहरला दवबिंदूंना लेऊनी सजला आसमंत अमृते नाहला फ़ूलपाखरे अहा नाचती कणाकणाने मधू प्राशती पराग प्रेमे वाटत सुटती पुष्पावरुनी पुष्पावरती मउ रेशमी झाल खुणावे नारींगी पंखात झुलावे घटकेसाठी शांत बसावे चंचल हे भ्रमण विसरावे बसुन मजेने पंख हलविले फ़ुलपाखरू तिथे थबकले लावण्याला फ़ुलही भुलले उराउरी भेटण्या विसरले जरा बागडून उडून जाई फ़ुल अचलसे भुलुनी राही भ्रमर अवचिते तेथे येई नारींगी पदरात विसावी फ़ूल येतसे भानावरती क्षुधा उफ़ाळे आतुन वरती आनंदे भ्रमरा अलिंगती शोषुन जीवन भुक शमविती

ज्योतीने तेजाची आरती..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 16/11/2010 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, माझ्याकडे काही दुर्मिळ चित्रसंग्रह आहे, त्यातला हा फोटू. कुणी कुणी दिलेली, कधी कुणाकडे मी मागितलेली. मग कधी ललीमावशी, तर कधी वत्सलाकाकू, तर कधी गजाननबुवांच्या घरातून, तर कधी कुणी जुनाजाणता रसिक.. अश्या अनेकांकडून काही जुनी चित्र हाती आली, पाहायला मिळाली. आजचं हे चित्र म्हणजे 'ज्योतीने तेजाची आरती..' म्हणावं असं... बाबूजी गजाननबुवा जोश्यांच्या पाया पडत आहेत तो हा क्षण...! आमच्या गजाननबुवांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही.

भवचक्र आणि मारीया

लेखक शुचि यांनी मंगळवार, 16/11/2010 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा हा साधारणतः जिव्हाळ्याचा विषय असतो. या विषयावरचे "माईंडफुलनेस अँड मनी - अ बुद्धीस्ट पाथ टू ऍबंडन्स" हे पुस्तक मला आवडलं होतं. त्यातील काही उतार्‍यांचे स्वैर भाषांतर म्हणा त्यातील उतार्‍यांवर आधारीत म्हणा हा लेख आहे.

[चौकशी] सिग्मा कंपनीच्या लेन्सेस

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/11/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्मा कंपनीच्या झूम लेन्सेस इथे कुणी वापरल्या आहेत का? पुण्यात त्या कुठे मिळतात याची माहीती हवी आहे.

आई.. मिटलेला श्वास - ७

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 16/11/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ :- http://www.misalpav.com/node/15395 पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन.. बांधावर पडलेल घर रानफ़ुलांचा एकेरी सूर भळभळणारा आठवांचा पाट डोळ्यामध्ये भयसंध्या दाट चंद्राची ढगात हूल सुनसान विचारांची भूल निशब्द एक काहूर मन व्याकुळ सैरभैर श्वास हवेत निस्तब्ध कळेना माझे प्रारब्ध स्मरणात तुझीया सुकलेले दोन नेत्र ------- शब्दमेघ
काव्यरस

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.