गुजरात सहल २०२१
गेल्या आठ वर्षांपासून आमच्या 'हिवाळी सहल ग्रुप' ची सहल नोव्हेंबर अखेर किंवा डिसेम्बरची सुरुवात या काळात होत असते. (अपवाद सन २०२०)
संपूर्ण ग्रुप जवळच्या नातेवाइकांचाच असून बहुतेक पुरुष मंडळी शेती व्यवसायाशी निगडित आहेत. महिला प्रत्यक्ष शेतात राबत नसल्या तरी शेतीविषयक व इतर घर कामांमध्ये खुप व्यस्त असतात. वर्षातून ८-१५ दिवस कुठेतरी निवांत मिळावेत इतकीच त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी त्यांना सोबत घेऊन जाणारे कोणीतरी पाहिजे होते तो पुढाकार आम्ही घेतला व गेल्या आठ वर्षात वेगवेगळ्या राज्यात हिवाळी सहली केल्या. आता पुढची पिढी घर व व्यवसाय इ.
मिसळपाव