किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका
किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका
कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!!
जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
अनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!!
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!
मिसळपाव
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात.
रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो.
चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर.
दुसर्या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात.
त्या बिचार्या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते !
जयंत कुलकर्णी.
हा फोटोत जरा छोटाच दिसतोय पण प्रत्यक्ष बराच मोठा होता.
आता आम्ही ह्याचा असा निकाल लावला. घरात कापणे तर शक्य नव्हते मग पहिला बाजारातुन त्याला कापुन आणले.