Skip to main content

प्रतिज्ञा....

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 16/12/2010 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वांनी लहानपणी शाळेत असतांना "भारत माझा देश आहे... " ही प्रतिज्ञा म्हटलेली असेलच. भाषा भिन्न असु शकते पण मतितार्थ समान. ह्या प्रतिज्ञेचा उपयोग काय आहे?

(गाडी सुटली , रुमाल हलले)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 16/12/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता : संदीप खरे गाडी सुटली , हमाल हलले , काढा चाळीस पटकन बोले, गाडी सुटली , पाकीट निघता , हमाल डोळे हसरे झाले, गाडी सुटली नोट वीसाची , हातामधुनि तरी सुटेना , चार बोचकी चाळीस रुपडे , पटू दे म्हटले तरी पटेना, का रे इतका जीव जाळुनी , नोट वीसाची हाती मिळते, डोळ्यादेखत गायब होते , खुर्दा चिल्लर हाती उरते. गाडी गेली फलाटावरी , लालपणाचा गलका झाला, गाडी गेली , सोडा मारुन जीव तापला हलका झाला. हे भलते अवजड असते , कुणी प्रचंडसे पेटारे , ते लांब लांब नेताना, डोक्याच्या उप्पर आणि काहिसे खूप घेताना,

नातं

लेखक शुचि यांनी गुरुवार, 16/12/2010 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
******काल्पनिक कथावस्तू/मुक्तक****** ______________________________________________________ अधून मधून आम्ही भेटत असतो. आताशा तो मला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागला आहे कारण जितक्या वेळा आम्ही भेटतो तितक्या वेळा त्याची ओळख पटते तर कधी नव्याने होते. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे की माझं काही त्याच्यापासून लपून कसं रहात नाही? त्याचे भेदक डोळे नीर्विकारपणे माझा ठाव घेतात. मिश्किल कुठला! वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही.

प्रवास मी एकटीच करते... (गीत)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... गुलाम जीवन खितपत मळले नाव माझी धारेत डळमळे कुठली नाही दिशाच ठावी गांव कोठले मला न कळले भाव भावनांचा बाजारी एकटीच मी दारोदारी विरक्त जीवन ईश्वर कोठे भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... - शब्दमेघ ... (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन ) हेल्प: चाल येथे सांगता येत नाहिये , तरीही राग थोडासा "दयाघना" गाण्यात वापरला आहे तसा आहे. रागाचे काही कळत नाही मला, पण मित्राने बंदिश गाताना तसे सांगितले म्हणुन ..
काव्यरस

सुलभ शौचालय - अशोक नायगांवकरांची कविता

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रोळीच्या संपतला मी म्हटले तु रूळावर काय शी करायला बसतोस? अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून? तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस? अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे तशी संपत म्हणाला - साहेब

कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल .. कहाणी .. १.

जे प्रेम करून लग्न करतात ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 15/12/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो जेव्हा ती प्रेम करते तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता दोघांचे एक गाणे असते चला इथपर्यंत पाऊलवाट सापडली स्वर्ग आता हाकेवर आहे आमचे प्रेमतर सात जन्माची ठेव आहे !! तो तिच्या डोळ्यात बघतो एक छान गाणे गातो ती डोळे मिटते त्याच्या गाण्यात हरवून जाते इथपर्यंत गाडी येता येता ती अवघड वाट संपून जाते प्रेमाचा शेवट लग्नात होतो हु.sss...शः....!! आई बाबांचा अवघड प्रश्न आपण चुटकीसरशी सोडवला ह्याच आनदात दोघे असतात संसाराचे गाणे ठेका धरून गात असतात ....!!
काव्यरस

काय करू मी बाई सांगा तरी काही

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/12/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
काय करू मी बाई सांगा तरी काही
काय करू मी बाई सांगा तरी काही रातीला मजला झोपच येत नाही ||धृ|| डोळं र्‍हाती माझं सताड उघडं कानं कानोसा घेती कवाडाकडं आता तुमी येनार, लगेच तुमी येनार मनाला वाटं पर तुमी काय येतच न्हायी काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| परवा म्हनं तुमी मी येतो उद्याच्याला कालचा दिस खाडा झाला, आजतरी कुठं आला एकलीच बसते विचार करते असं छळू नका डोळं लावून तुमची वाट मी पाही काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०
काव्यरस