Skip to main content

मध्यरात्र..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 17/12/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्री कधीतरी येते जाग कशी कुणास ठाऊक ...? मी बघत बसतो खिडकीतून डोळे किलकिले करून माझ्या खिडकीतून दिसणारे आभाळ नि खिडकीतून दिसणारे हे पारिजातकाचे झाड मध्यरात्री कधी जाग आली की झाडावर ओठंगलेला चंद्र दिसतो माझ्या सुरक्षित अंतरावरून हे दृश्य सुंदर मस्त दिसतेय !! चीडीचीप्प रात्र नि हे जीवघेणे झाड ध्यान लावून बसलेले.... बायको मस्त गाढ झोपलेली नि मी असा बेचैन मी उठतो नि किचन मध्ये जातो सकाळी काहीच नसणारे झुरळे आता मस्त फिरत असतात अन्न-कण शोध मोहिमेवर .... कोठे लपतात नि कोठून येतात अचानक कुणास ठाऊक.. ?
काव्यरस

पुन्हा तुझीच वाट पहात आहे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 16/12/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू उशीरा येण्याची आता सख्या सवय झाली आहे तरी ही टेबलावर जेवण अन दारावर डोळे ठेवून मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती नव्यानेच लिहिलेले काही क्षण मन पटलावर पुन्हा एकदा थैमान घालू लागले.. अन विचारांच्या वादळात अनेक अनुत्तरीत प्रश्न पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर अस्त व्यस्त पणे धडकू लागले का रे सख्या असा करतोस ?

माझा बी एक इनोद.

लेखक नरेशकुमार यांनी गुरुवार, 16/12/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आता याला इनोद म्हण्या ऐवजी हा एक लयी दुष्ट/वाईट प्रकार हाय, जो मी माझ्या एका परम मित्राच्या बाबतीत नेहमी करतो. मी हापिसात एकदम कोपर्यात बसतो. त्यामुळ माझे मोनिटर कोणाला दिसत नाय. माझ्या पुढे माझा एक मित्र बसतो(आम्ही सगळे त्याला लाडाने 'केत्या' बोलतो). त्याचा मोनिटर मला आणि आजूबाजूच्या तीन-चार जणांना दिसतो. पन त्याच्या लीड ला दिसत नाय. इतर येळेला नाही, पण मुद्दामून तो जेव्हा काही अरजन्ट काम करत असेल त्या वेळेस मी त्याला उगाचच एक आरोळी ठोकतो. "ए केत्या, फोरवर्ड कर रे." (जणु काय तो काम सोडुन टाईम पास करतोय) वाईट चिडून तो माझ्याकडे बघतो.

युगलगीतः मला वाजतीया थंडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/12/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः मला वाजतीया थंडी तो: ए, मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल अग मला वाजतीया थंडी ||धृ|| ती: आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: गारगार वारं सुटलया मरनाचं हुडहुडी भरलीया माझ्या अंगात असला गारठा नाय पाहिला जल्मात कधी अग मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||१|| आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: कराकरा दात माझं वाजतया हातावर हात माझं चोळतोया जवळ ये, अशी दवडू नको संधी अग मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||२|| आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: अशी ग तू काय करते
काव्यरस

जख्ख अशी म्हातारी !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 16/12/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
जख्ख अशी म्हातारी कोयत्याच्या आकारची !! कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ? हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी बुबुळावरची राखाडी रंगाची साय खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ .... किती कुणास ठाऊक ? आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत पोरेबाळे आपल्याच फिकिरीत नातवाच्या काळजीत खंगून जातात म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून कधी सुटतेय म्हातारी वाट बघत बसतात ...!! वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ... थकून जातात गात्रे नि गात्रे .... म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत तिला कधी कधी आठवत असते नवरोबांनी गर्दीत एकांत शोधीत चिमटा काढलेला त्या आठवणीनी तिच्या अंगावर उठ
काव्यरस

जख्ख अशी म्हातारी !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 16/12/2010 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
जख्ख अशी म्हातारी कोयत्याच्या आकारची !! कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ? हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी बुबुळावरची राखाडी रंगाची साय खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ .... किती कुणास ठाऊक ? आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत पोरेबाळे आपल्याच फिकिरीत नातवाच्या काळजीत खंगून जातात म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून कधी सुटतेय म्हातारी वाट बघत बसतात ...!! वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ... थकून जातात गात्रे नि गात्रे .... म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत तिला कधी कधी आठवत असते नवरोबांनी गर्दीत एकांत शोधीत चिमटा काढलेला त्या आठवणीनी तिच्या अंगावर उठ
काव्यरस

विधाता

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 16/12/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझा असा पचका बर्‍याच वेळेस होतो. एखादा चित्रपट अचाट आणि अतर्क्य असेल म्हणून रेवडी उडवायला वैचारिक उच्चासनावर बसावे आणि चित्रपट नेमका चांगला निघतो. ह्याबद्दल जवळजवळ तसेच झाले. पण जे काही थोडेफार दिसले ते गोड (किंवा खमंग) मानून घ्यावे. 'विधाता' ला असलाच एक मिळाला म्हणून आधी खवचट हसू घेऊन बघायला बसलो, आणि यातील दिग्गजांच्या अभिनयाने थक्क झालो. संजीवकुमारच्या अनेक नकला नंतर बघितल्यामुळे मूळ अदाकारीच आता जरा 'अती' वाटते पण ती त्याची चूक नाही. शम्मी ही मस्त. पण खरी मजा आणतो दिलीप कुमार. अमिताभच्या अनेक पिक्चर्स प्रमाणे काही काही ठिकाणी अचाट प्रसंगही दिलीप कुमार जबरी उचलतो.

सिंगलौटिंग द मेल्स .. व्हाट द फ$

लेखक टारझन यांनी गुरुवार, 16/12/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , तसा आम्ही आमच्या बोळे क्लबात बर्‍याच विधायक,सामाजिक , भौगोलिक , अंतराष्ट्रिय , आर्थिक , वैद्यकिय , अभियांत्रिकी आणि इतर अनेक गोष्टींवर रात्ररात्रभर चर्चा आटवतो . काल चर्चेचा सुर लांबला तो पुरुषांना सिंगल आउट करण्याच्या प्रकरणावरुन. दोस्तांनो .. तुम्हाला तर माहित आहे , प्रेमभावना हा हार्मोन्स चा लादेन आहे . आणि ती इस्त्री-पुरुष दोघांनाही निसर्गाने समान दिलेली आहे. आय मीन दोघांच्या इंजिनाचे गियर - कॉम्बीनेशन वेगळे असतील आणि ते वेगवेगळ्या आर.पी.एम वर वेग॑वेगळी हॉर्सपावर देखिल निर्माण करत असतील , बट यु णो , दे बोथ आर बिल्ड फॉर स्पीड :) (बाऊंसर जातंय का ?