Skip to main content

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 22/12/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

अग्नि..

लेखक ज्ञानराम यांनी बुधवार, 22/12/2010 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
कालजात माझ्या अजून राग आहे , मेलेल्या नजरेला अजून जाग आहे, कोण विझवेल माझि चिता हि माझि?
काव्यरस

मंथूनी नवनीता...व्यर्थ कथा सांडी मार्ग।

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 22/12/2010 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या देव, धर्म, ईश्वर, पुराण असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धर आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणात वाढलो गेलो त्यातून आलेली भोळसट श्रद्धा असणारे, सारासार विचार न करण्याची, तसा विचार करु न देण्याची दडपशाहीची, भीतीची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (देवाचे ना करायलाच हवे असे मत, का कशासाठी ते ठाऊक नसले तरी चालेल ) जुन्या भारतीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच वैदिक्/हिन्दू) बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूळाकडे जाण्याची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व मार्गांमध्ये आढळतो.

युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ?

लेखक वडिल यांनी बुधवार, 22/12/2010 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक अर्थव्यवस्था कोलमडत आहे. अमेरीके सारखा श्रीमंत देश जवळ जवळ कंगाल झाला आहे. युरोप त्याच स्थितित आहे. भारत , चीन, ब्राजिल, रशिया सारखे देश जागतिक अर्थव्यवस्था पुन: जिवित करतील अशी आशा जगभर आहे. ओबामा नंतर रशिया, चीन , फ्रान्स आदि देशांचे प्रमुख भारताचे कौतुक करुन (हरभर् या च्या) झाडावर चढवत आहेत. स्वत: च्या फायद्या साठि भारतीय बाजारपेठ आणि कन्जुमर कडे सगळ्यांचे लक्ष आहे. युध्द शस्त्राचा भारत हा मोठा आयात कर्ता आहे.

चिलीया बाळाची कथा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/12/2010 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय. त्याच संदर्भातील एक गाणे आठवले . त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का? असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे. चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?

चीनचे मनसे.

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/12/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल.

एक प्रश्न...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 22/12/2010 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
Genesis 47 (New King James Version) वाचतांना खालील वाक्य वाचले. 15 So when the money failed in the land of Egypt and in the land of Canaan, all the Egyptians came to Joseph and said, "Give us bread, for why should we die in your presence?

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 21/12/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं.