Skip to main content

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/12/2010 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी कोणी म्हणेल, "आ गाय मुझे मार" असा हा उद्योग आहे. पण रोज मरे त्याला कोण रडे? मेलेले कोंबडे आगीला भीत नसते. तेव्हा मी प्रथम आगीत उडी घेतो! १) तोंडात तीळ न भिजणे. सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही. फोनवर नुसता निरोप कधीच सांगणार नाहीत. एकदा फोन हातात घेतला, की दोन तासांची निच्छिती! २) उड उड ग चिउ.

दादोजी कोंडदेव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 23/12/2010 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला. लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्‍वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा. सकाळ पेपरातली बातमी

भ्रष्ट भारतीय पत्रकारिता

लेखक बेभान यांनी गुरुवार, 23/12/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच देशाला हादरवून ठेवलेल्या २जी घोटाळ्याबाबत मिसळपाववर उदासिनता ? मला यावर बी.बी.सी.वरचा (http://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2010/11/indian_medias_credibility_crisis.html) सौतिक बिस्वास यांचा हा लेख मिपाकरांबरोबर शेअर करण्यास आवडेल. त्यालेखावरील प्रतिसाद वाचण्यास विसरू नका. भारतीय भ्रष्ट सरकारचे पत्रकारितेसोबत असलेले साटे-लोट्याचे संबंध यातून बाहेर आले.

मदत हवीय

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 23/12/2010 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत. साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल. धन्यवाद, समीर

मराठी पाऊल पडते पुढे

लेखक कौतुक शिरोडकर यांनी गुरुवार, 23/12/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो ! फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री.

तुझी माझी प्रित होती

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/12/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित होती
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ|| हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची भेटलो तो किनारा, विसरूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१|| त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२|| आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार भेट दिली घेतली, परत घेवूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||
काव्यरस

अणु युध्द आणि भारत : कधी आणि का ?

लेखक वडिल यांनी गुरुवार, 23/12/2010 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
अणुयुध्दा बद्दल चर्चा जरी भयावह वाटली तरी ते एक सत्य आहे आणि नाकारता येणार नाहि. अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. प्रश्व येवढाच आहे कि ते कधी आणि कसे ? भारताने किती हि शांती चा पुरस्कार करत अणुकार्यक्रम कार्यरत ठेवला तरी एके दिवशी सत्या ला समोरे जात...जे गरजेचे आहे ते करावे लागेल. अणुशस्त्रां मधे जेवढी गुंतवणुक होते आहे कि एके दिवशी ह्या गुंतवणुकीच्या रीटर्नस साठी तरी अणुयुध्द्द गरजेचे होइल. अणुभट्ट्या जरी उर्जे साठि वापरल्या तरी त्या अत्यंत धोकादायक असतात. फ्रांस आणि उत्तर अमेरीकेत अणुउर्जे च्या प्रकल्पां च्या सुरक्षे चा खर्च लक्षणिय आहे.

पीराची चादर ...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 23/12/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एका पीराच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. बाहेर पाटी होती "स्त्रियांनी पीराला हात लावु नये. डोक्यावर टोपी घालुन किंवा रुमाल, वस्त्राने केस झाकुनच प्रवेश करावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात आत येऊ नये" मी भेट दिलेल्या अनेक पीरांच्या, दर्ग्याच्या बाहेर अशाच सुचना असतात. आत पिराला सुंदर, झुळझुळीत हिरव्या चादरीने झाकलेले होते. त्यावर फुलांच्या माळा होत्या. एक पोरगेलेसा फकिर हातातल्या चावरीने त्यावरच्या माशा हाकलत होता. पलि़कडे एक मध्यमवयीन फकीर कुराणपठन करत बसला होता. त्याच्याशी अल्लाह, नबी, प्रेषित यांच्या महान कर्तबगारीची चर्चा करत मी माझ्या शंका विचारत होतो.