सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे
आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे
गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर?
कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे
प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू?
माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे
आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे
हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे
निर्भीडतेने 'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव
ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
काव्यरस
मिसळपाव
माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत.